कटकट गेट, अंमली पदार्थ विक्री करणा-या आरोपींची काढली धिंड...

कटकट गेट, अंमली पदार्थ विक्री करणाऱ्यांची पोलिसांनी काढली धिंड
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.1(डि-24 न्यूज) -
गणेशोत्सव काळात अंमली पदार्थाची विक्री करणाऱ्या तीन आरोपींची अंमली पदार्थ विरोधी पथकाने आज सायंकाळी 5.30 वाजेच्या दरम्यान कटकटगेट परिसरातून धिंड काढली होती. नशेसाठी चरसची विक्री करणाऱ्या 5 जणांना मुकुंदवाडी पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून त्यातीलच हे 3 आरोपी असल्याची माहिती अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या सूत्रांनी दिली. अमली पदार्थ विरोधी पथकाचे प्रमुख श्रीमती गिता बागवडे यांनी यावेळी जनजागृती करत नागरीकांनी आवाहन केले शहरात कोणत्याही ठिकाणी बटन, चरस, गांजा व अमली पदार्थांची विक्री करताना आढळल्यास पोलिसांना माहीती द्यावी नाव गोपनीय ठेवले जाईल. तात्काळ अवैध नशा विक्री करणा-यांवर कार्यवाई केली जाईल. पोलिस आयुक्त प्रविण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पथक सक्रीय आहे. पालकांनी सावधगिरी बाळगून आपल्या मुलांना नशेच्या आहारी जावू नये यासाठी सतर्क राहण्याचे आवाहन केले. नशेच्या गोळ्यांची व सिरपची वाहतूक करण्यासाठी कोरीयर, ट्राव्हल्स बसचा उपयोग केला जात आहे यावर पोलिसांची कडक नजर असल्याचे त्यांनी सांगितले.
काल मुकुंदवाडी परिसरातील अंबिकानगर येथे नशेखोरांना चरसची विक्री करण्यासाठी आलेल्या मोहम्मद मुजम्मील मोहम्मद नजीर (वय 34 वर्ष), लोमान ऊर्फ नोमान खान इरफान खान (वय 21 वर्ष), दोघे राहणार रहेमानिया कॉलनी, मोहम्मद लईखुद्दीन मोहमद मिराजोद्दीन (वय 25 वर्ष), राहणार रहीमनगर, शेख रेहान शेख अश्फाक (वय 19 वर्ष), रा. कटकटगेट आणि शेख सुलताना शेख मैनोद्दीन अशा 5 जणांना मुकुंदवाडी पोलिसांनी अटक केली असून त्यांच्या ताब्यातून पोलिसांनी 15 लाख रुपये किंमतीची दीड किलो चरस आणि दोन दुचाकी जप्त केल्या आहेत. अटकेत असलेल्या आरोपीविरुध्द अंमली पदार्थ विरोधी प्रतिबंधकात्मक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, अंमली पदार्थ विरोधी पथकाने सोमवारी नशेसाठी चरस विकणाऱ्या शेख रेहान शेख अश्फाक, मोहम्मद लईखुद्दीन मोहमद मिराजोद्दीन आणि मोहम्मद मुजम्मील मोहम्मद नजीर या आरोपींची धिंड काढली. यावेळी बघ्यांची गर्दी झाली होती.
अंमली पदार्थ विक्रेत्यांची माहिती द्या
अंमली पदार्थ व नशेच्या गोळ्या विकणाऱ्यांची माहिती पोलिसांना दिल्यास त्यांच्यावर तात्काळ कारवाई करण्यात येईल अशी माहिती अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या निरीक्षक गीता बागवडे यांनी दिली. तसेच अंमली पदार्थ विक्रेत्यांची माहिती देणाऱ्याचे नाव गोपनिय ठेवण्यात येईल असेही त्यांनी.
What's Your Reaction?






