श्री गणेश महासंघाच्या वतीने महापुरुषांच्या पुतळ्यांची साफसफाई करुन अभिवादन...

 0
श्री गणेश महासंघाच्या वतीने महापुरुषांच्या पुतळ्यांची साफसफाई करुन अभिवादन...

जिल्हा श्री गणेश महासंघाच्या वतीने महापुरुषांच्या पुतळ्यांची साफ सफाई करून अभिवादन

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.1(डि-24 न्यूज) - श्री गणेश महासंघ उत्सव समितीच्या वतीने जिल्हा संस्थापक अध्यक्ष पृथ्वीराज भाऊ पवार यांच्या मार्गदर्शनात आणि उत्सव समितीचे अध्यक्ष अनिकेत निल्लावार यांच्या नेतृत्वात सोमवारी (दि.1) सकाळी 8 वाजता महापुरुषांच्या पुतळ्याची साफ सफाई करून अभिवादन करण्यात आले. 

या उपक्रमाची सुरुवात क्रांती चौक येथील छत्रपती शिवाजी महाराज, पैठण गेट येथील लोकमान्य टिळक, स्वातंत्र्य सेनानी गोविंदभाई श्रॉफ, संभाजीपेठ येथील क्रांतिसूर्य महात्मा फुले, क्रांतिज्योती सावित्री बाई फुले, मिल कॉर्नर येथील छत्रपती राजर्षी शाहू महाराज, यांच्या पुळ्यांची साफ - सफाई करून अभिवादन करण्यात आले. या उपक्रमात कार्याध्यक्ष डॉ. राजेंद्र दाते पाटील, विकी जाधव, हरीश शिंदे, महेश उबाळे, ऍड.निकेत अर्पल, शिवा ठाकरे, अजय कागडा, फैजान शेख, वैभव ठाकरे, संजय दुर्ब, प्रसिद्धी प्रमुख सचिन लिला सुखदेव अंभोरे यांनी पुढाकार घेतला.

बुधवारी रंगणार भव्य कुस्त्यांची दंगल...

महाराष्ट्र केसरी सय्यद चाऊस, शिवराज राक्षे यांचे विशेष आकर्षण...

छत्रपती संभाजीनगर जिल्हा श्री गणेश महासंघ उत्सव समिती च्या वतीने महाराष्ट्राच्या मातीतील अस्सल मैदानी कुस्त्यांची भव्य दंगल स्पर्धा बुधवारी (दि. 3) दुपारी 1 वाजता होणार आहे. सण उत्सवाची परंपरा, संस्कृती जोपसणाऱ्या भव्य कुस्त्यांच्या दंगलीचे यावर्षीचे विशेष आकर्षण म्हणजे सय्यद चाऊस ( महाराष्ट्र केसरी 2006), व शिवराज राक्षे (महाराष्ट्र केसरी 2023-24) यांची या कुस्ती स्पर्धेसाठी उपस्थिती राहणार असल्याची माहिती उत्सव समितीचे अध्यक्ष अनिकेत निल्लावार यांनी दिली.

या भव्य कुस्ती स्पर्धेसाठी पंच कमिटी चे मुख्य मार्गदर्शक म्हणून डॉ. हंसराज डोंगरे, सल्लगार समिति म्हणून ऍड सेवकचंद बाखरीया, पैलवान ज्ञानेश्वर जाधव, विनायक पांडे,फुलचंद सलामपुरे सूरजलाल मेघावाले,हिरा सलामपुरे, जगदीश सिद्ध, चेतन जांगडे, सुरेश पवार, तर पंच कमिटी म्हणून मंगेश डोंगरे, रामेश्वर विधाते, सोमनाथ बखले, प्रवीण कडपे, पै. विष्णु गायकवाड, भगवान चित्रक, हरिदास म्हस्के, अर्जुन औताडे, मुख्तार पटेल, नवनाथ औताडे, इद्रीस खान, अशोक गायकवाड, अविनाश पवार, संदेश डोंगरे हे काम पाहणार आहेत. कुस्ती स्पर्धेचे निवेदन बाबासाहेब थोरात हे करतील. या भव्य कुस्ती स्पर्धेसाठी श्री गणेश भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन श्री गणेश महासंघ उत्सव समितीचे अध्यक्ष अनिकेत निल्लावार यांनी केले आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow