काँग्रेस नेते अॅड मसरुर खान यांच्या वतीने उमीद पोर्टलवर नोंदणी करण्यासाठी राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद...

 0
काँग्रेस नेते अॅड मसरुर खान यांच्या वतीने उमीद पोर्टलवर नोंदणी करण्यासाठी राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद...

काँग्रेस नेते अॅड. मसरूर सोहेल खान यांच्या वतीने तिसरा मोफत UMEED नोंदणी शिबिर — राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.16(डि-24 न्यूज)– बैतुल यतीम शाही मशीद येथे काँग्रेस नेते अॅड. मसरूर सोहेल खान यांच्या मार्गदर्शनाखाली तिसरे मोफत वक्फ मालमत्ता नोंदणी शिबिर संपन्न झाले. या शिबिराला महाराष्ट्रभरातून अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. विविध जिल्ह्यांतील मदरसे, मशिदी, कब्रस्तान आणि इतर वक्फ मालमत्तांचे जबाबदार व्यक्ती मोठ्या संख्येने उपस्थित राहिले. शिबिरात 180 हून अधिक वक्फ मालमत्तांची नोंदणी UMEED पोर्टलवर करण्यात आली.

वक्फ मालमत्तांची सुरक्षा आणि पारदर्शक व्यवस्थापनासाठी UMEED पोर्टलवर नोंदणी करणे अनिवार्य आहे. याच जनजागृतीसाठी आयोजित केलेले हे तिसरे शिबिर दुपारी 2 ते सायं 6 वाजेपर्यंत चालले.

शिबिरास छत्रपती संभाजीनगरसह मुंबई, बीड, परभणी, नांदेड, धाराशिव(उस्मानाबाद), धर्माबाद, अहिल्या नगर(अहमदनगर), सिलोड, कन्नड, वैजापूर, कसाबखेडा, जालना आदी शहर व तालुक्यांमधील प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. नोंदणीसोबतच UMEED पोर्टलवरील प्रक्रियेबाबत मार्गदर्शन व प्रशिक्षणही देण्यात आले.

शिबिराच्या यशस्वी आयोजनानंतर अनेक सहभागी यांनी इतर शहरांमध्येही अशी शिबिरे आयोजित करण्याची मागणी केली. यावेळी अॅड. मसरूर सोहेल खान म्हणाले,

“वक्फ मालमत्तांची नोंदणी करण्याची अंतिम तारीख 5 डिसेंबर आहे. त्यामुळे सर्व जबाबदार व्यक्तींनी वेळ न घालवता त्वरित नोंदणी पूर्ण करावी.”

शिबिरात मुफ़्ती नासिर, ताहिर अहमद, इब्राहिम पठाण, हमाद चाऊस, इदरीस नवाब खान, मोइन कुरैशी, इरफान पठाण तसेच वक्फ बोर्डाचे अधिकारी मुज़म्मिल खान, मोहम्मद मुदस्सिर, नूरुल मुक़्तादिर, मोहम्मद रईस, अब्दुल मतीन आणि अन्य सहकाऱ्यांनी सहभाग घेतला.

सर्वांनी शिबिर यशस्वी करण्यासाठी मोलाचे

योगदान दिले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow