दिमाखदार सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भाजपाचे विभागीय कार्यालयाचे उद्घाटन संपन्न...
भाजपाचे विभागीय कार्यालयाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.16(डि-24 न्यूज) -भारतीय जनता पार्टी मराठवाडा विभागीय कार्यालयचे भव्य, आधुनिक आणि अत्याधुनिक सुविधांनी युक्त नवीन कार्यालय छत्रपती संभाजीनगर शहरात उभारण्यात आले आहे. मराठवाडा विभागात भाजप संघटनेच्या पुढील बळकटीसाठी, कार्यकर्त्यांना प्रेरणादायी व सक्षम कार्यपरिसर उपलब्ध करून देण्यासाठी आणि पक्षाच्या दैनंदिन कामकाजाला अधिक गती देण्यासाठी हे कार्यालय अत्यंत महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे.
आज या विभागीय कार्यालयाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते उत्साहपूर्ण आणि दिमाखदार सोहळ्यात संपन्न झाले. उद्घाटन कार्यक्रमात कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त सहभाग, आधुनिक पायाभूत सुविधांची झलक आणि नेतृत्वाचे मार्गदर्शन यामुळे वातावरण उत्साहवर्धक होते.
या कार्यालयात अत्याधुनिक डिजिटल सुविधा, आधुनिक सभागृह, प्रशस्त बैठक कक्ष, संवाद व जनसंपर्क केंद्र, दस्ताऐवजीकरण सुविधा, प्रशासनिक विभाग, तसेच संघटनात्मक कामकाजासाठी सर्व आवश्यक व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यामुळे मराठवाड्यातील भाजपचे संवाद, समन्वय, नियोजन आणि कार्यप्रणाली अधिक प्रभावी व परिणामकारक होणार आहे.
उद्घाटन प्रसंगी मुख्यमंत्र्यांनी मराठवाड्यातील संघटन कार्याला गती देण्यासाठी या कार्यालयाचे महत्त्व अधोरेखित केले. पक्षाच्या जनाधार विस्तारासाठी आणि विकासाभिमुख राजकारणाला अधिक बळ देण्यासाठी हे ठिकाण निर्णायक भूमिका बजावेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी या कार्यालय निर्माण प्रसंगी ज्यांनी सहकार्य केले असे आर्किटेक्ट इंजिनीयर, कॉन्ट्रॅक्टर, या सर्वांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
या भव्य उद्घाटन सोहळ्याच्या प्रसंगी इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, महिला आयोगाच्या अध्यक्षा सौ. विजयाताई रहाटकर, पर्यावरण व हवामान बदल मंत्री सौ. पंकजाताई मुंडे, ऊर्जा राज्यमंत्री सौ. मेघनाताई बोर्डीकर, खासदार डॉ. भागवत कराड, खासदार डॉ. अजित गोपछडे, माजी केंद्रीय मंत्री श्री. रावसाहेब दानवे पाटील, आमदार श्री. बबनराव लोणीकर, आमदार श्री. नारायण कुचे, आमदार श्री. मिहिर कोटेचा, आमदार श्री. प्रशांत बंब, आमदार श्री. संजय केनेकर, संघटन मंत्री श्री. संजय कौडगे, आमदार सौ. अनुराधाताई चव्हाण, आमदार श्री. सुरेश धस, शहर जिल्हाध्यक्ष श्री. किशोर शितोळे, जिल्हाध्यक्ष श्री. सुहास शिरसाट, जिल्हाध्यक्ष श्री. संजय खंबायते, जिल्हाध्यक्ष श्री भास्कर आबा दानवे, श्री.शिरीष बोराळकर, श्री.अनिल मकरीये, श्री.बापू घडामोडे, श्री.किरण पाटील यांसह इतर पदाधिकारी व मोठ्या संख्येने भाजप कार्यकर्ते उपस्थित हो
ते.
What's Your Reaction?