उध्दव ठाकरे यांचे मार्गदर्शन ऐकण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे - शिवसेना नेते चंद्रकांत खैरे
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे मार्गदर्शन ऐकण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित रहा
शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांचे आढावा बैठकीत आवाहन
7 जुलै रोजी होणार्या शिवसंकल्प मेळाव्याची जय्यत तयारी
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) दि.4 (डि-24 न्यूज) - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थित रविवार, 7 जुलै रोजी सुर्या लॉन्स, बीड बायपास रोड येथे शिवसंकल्प मेळावा आयोजित केला आहे. या मेळाव्याची जिल्हाभरात जय्यत तयारी सुरू आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे मार्गदर्शन ऐकण्यासाठी शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी केले. शिवसेनाभवन येथे आयोजित जिल्हास्तरीय बैठकीत त्यांनी पदाधिकार्यांना मार्गदर्शन केले.
केंद्रातील आणि राज्यातील सरकारच्या आडमुठे धोरणामुळे सध्या शेतकरी, कामगार आणि सर्वसामान्य जनता हैराण झाली आहे. महागाई, बेरोजगारी आदी गोष्टीची सरकारला घेणेदेणे नाही, फक्त सत्ता स्थापन करण्याची त्यांना घाई झाली आहे. येणार्या निवडणुकीत राज्यात सत्तांतर अटळ असून, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षांशी एकनिष्ठ राहण्याचे आवाहन खैरे यांनी केले. शहरावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विशेष प्रेम होते. तीच परंपरा शिवसेना प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे व आदित्य ठाकरे यांनी कायम राखली आहे. यामुळेच शहरातील निष्ठावंत शिवसैनिकांनी पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे विचार व मार्गदर्शन ऐकण्यास मोठ्या संख्येत उपस्थित रहावे असे आदेश शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी दिले.
बैठकीस राज्यसंघटक चेतन कांबळे, जिल्हा सहसंपर्कप्रमुख विजय साळवे, महानगरप्रमुख राजू वैद्य, माजी महापौर नंदकुमार घोडेले, लोकसभा समन्वयक, माजी महापौर सुदाम सोनवणे पाटील, शहरप्रमुख विश्वनाथ स्वामी, बाळासाहेब थोरात, विजय वाघचौरे, उपजिल्हाप्रमुख अनिल पोलकर, आनंद तांदुळवाडीकर, संतोष खेंडके, शिवा लुंगारे, हिराभाऊ सलामपुरे, लक्ष्मीनारायण बाखरिया, विनायक गणु पांडे, अरविंद धिवर, राजेंद्र राठोड, तालुकाप्रमुख बाळासाहेब गायकवाड, विधानसभा संघटक दिग्विजय शेरखाने, गोपाळ कुलकर्णी, उपशहरप्रमुख जयसिंह होलिये, मकंरद कुलकर्णीष सचिन राठोड, संदेश कवडे, गौरव पुरंदरे, राजु खरे, साहेबराव घोडके, सुमीत्र डिकोंटवार, नितीन पवार, बापु गवळी, रवी गायकवाड, , बाबासाहेब कारले, सचिन राठोड, महिला आघाडीच्या सुनीता आऊलवार, सुनीता देव, आशा दातार, मीरा देशपांडे, रेणुका जोशी, मीना थोरवे, राखी सुरडकर, कविता मठपती, सुषमा यादगीरे, अरुणा भाटी, सुकन्याताई भोसले, सिमा गवळी, नलिनी महाजन, जमुनाबाई ठाकूर, सारिका शर्मा, लता तेजाळ, अरुणा चव्हाण, अपर्णा रामावत, रंजना कोलते, रोहिणी काळे, रेखा शाह, लता सपकाळ, विजयाताई त्रिभुवन यांच्यासह मोठ्याप्रमाणात शिवसैनिक व पदाधिकारी उपस्थित होते.
What's Your Reaction?