औरंगाबाद लोकसभा जागा सोडणार नाही...! जरांगेंवर आंबेडकरांचे मोठे विधान

 0
औरंगाबाद लोकसभा  जागा सोडणार नाही...! जरांगेंवर आंबेडकरांचे मोठे विधान

औरंगाबाद लोकसभा निवडणुकीची जागा सोडणार नाही, हि जागा वंचितने जिंकली होती, उमेदवार गुलदस्त्यात....

जरांगेंचा माॅर्फींग केलेला व्हिडिओ व्हायरल होऊ शकतो...एड प्रकाश आंबेडकर यांचे पत्रकार परिषदेत विधान....

बदनामी पासून वाचवण्यासाठी राजकारणात यावे....दिला जरांगेंना सल्ला...

औरंगाबाद, दि.14(डि-24 न्यूज) औरंगाबाद लोकसभेची जागा मागच्या वेळी आम्ही जिंकली होती. आम्ही हि जागा सोडणार नाही. आमचा उमेदवार गुलदस्त्यात आहे. उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसाची वाट बघा. खासदार इम्तियाज जलील उमेदवार होऊ शकतात का...? या प्रश्नावर एड प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले आमचा उमेदवार गुलदस्त्यात आहे. काही दिवसाअगोदर इम्तियाज जलील यांनीही सांगितले होते मोदींना रोखण्यासाठी वंचित सोबत युतीसाठी बोलणी होऊ शकते यामुळे वंचित- एमआयएमचे उमेदवार इम्तियाज जलील पण होऊ शकतात यामध्ये आश्चर्य वाटायला नको कारण मागच्या निवडणुकीत वंचित सोबत युतीमुळे ते जिंकले होते म्हणून आंबेडकर यांनी सांगितले हि जागा आम्ही सोडणार नाही असा इशारा दिला आहे. यावेळी राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

त्यांनी पुढे सांगितले महाराष्ट्रात आयाराम गयाराम यांचे राजकारण सुरू आहे. काही लोकांचे अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. मनोज जरांगे पाटील यांचे मराठा आरक्षणाचे आंदोलन कुठल्याही राजकीय पक्षाला काबूत घेता येत नाही म्हणून या ना त्या त-हेने ते दाबण्याचा प्रयत्न सुरू आहे. जरांगेंचा सोपिंग करुन एक व्हिडिओ करण्यात आला आहे. त्या निमित्ताने दबाव टाकण्याची शक्यता आहे. माॅर्फ केलेला व्हिडिओ व्हायरल होऊ शकतो. त्यांची बदनामी करण्याचा प्रयत्न केला जाण्याची शक्यता आहे. घाणेरडे राजकारण अदृश्य शक्ती करत आहे. याबाबत जरांगे पाटील यांनी दक्षता घ्यावी जनतेला सुध्दा माझे आवाहन आहे. जे सोशल मीडियावर दाखवले जाते ते एडिट करून बदल करून दाखवता येते. याला माॅर्फींग करणे म्हणतात. जरांगे पाटील यांच्या अनुषंगाने ज्या काही व्हिडिओ क्लिप येतील त्यावर विश्वास ठेऊ नये. जरांगे पाटील यांनी आता राजकीय प्रवास केल्याशिवाय या बदनामी पासून वाचू शकत नाही आपल्या समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी सभागृहात जाणे आवश्यक आहे. मराठा आरक्षण कायदा टिकवण्यासाठी त्यांना राजकीय पुढाकार घ्यावा लागणार आहे. त्यांना त्यांच्याच समाजात विरोध करणारे आहे. त्यांना हे उत्तर असेल. बांधावरचे लोक जरांगेसोबत उभे राहतील. लोकसभा निवडणूक निघून गेल्यानंतर विधानसभा निवडणूक गेल्यानंतर हे सगळे लोक जरांगे पाटील यांनी जो हत्ती आत घातला आहे तो हत्ती हे लोक शेपटी ओढून बाहेर खेचतील. महाविकास आघाडी जागावाटपात काही जागेवर घोडे अडले असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी खासदार संजय राऊत हे शिवसेनेचे की राष्ट्रवादीचे प्रवक्ते आहेत हे समजत नाही म्हणत त्यांच्यावर टीका केली. काँग्रेस आणि शिवसेनेत(उबाठा) दहा जागेवर तिढा आहे तर काँग्रेस, राष्ट्रवादी (शरद पवार गट) आणि शिवसेनेत पाच जागांवर तिढा आहे त्यामुळे त्यांचा तिढा सुटल्यानंतर मला कोणाशी बोलायचे हे ठरवता यैईल. औरंगाबादची जागा आम्ही जिंकली आहे. आम्ही हि जागा सोडणार नाही. आमचा उमेदवार गुलदस्त्यात आहे असे आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. काँग्रेसने दोन तीन वेळा मुस्लिम उमेदवार देऊन मला पाडले. पण यावेळी तेथील जनता रागात आहे. यावेळी मुस्लिम उमेदवार दिला तर मर्डर करतील असे आंबेडकर यावेळी म्हणाले. उद्या होणारी महाविकास आघाडीच्या बैठकीत मला निमंत्रण मिळाले नाही असे ते म्हणाले.

पत्रकार परिषदेत धैर्यशील फुंडकर, सिध्दार्थ मोकळे, योगेश बन, प्रभाकर बकले, तय्यब जफर, लता बमने, मतीन पटेल उपस्थित होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow