वंचितचे जलिस अहेमद विधानसभेसाठी इच्छुक...!
![वंचितचे जलिस अहेमद विधानसभेसाठी इच्छुक...!](https://d24news.in/uploads/images/202407/image_870x_668ff7fdb3e98.jpg)
वंचितचे जलिस अहेमद विधानसभेसाठी इच्छुक...!
छ.संभाजीनगर(औरंगाबाद) दि.11(डि-24 न्यूज) औरंगाबाद मध्य विधानसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीचे औरंगाबाद मध्यचे अध्यक्ष जलिस अहेमद हे निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. त्यांनी पक्षाचे सर्वेसर्वा एड बाळासाहेब आंबेडकर यांच्याकडे उमेदवारी मिळावी यासाठी पत्र दिले आहे. मागिल अडीच वर्षांपासून जलिस अहेमद यांनी विविध अक्रामक आंदोलने करून चर्चेत आले आहे. मागिल निवडणुकीत वंचितचे नेते अमित भुईगळ यांनी या मतदारसंघातून निवडणूक लढले होते. यावेळी इच्छुक मध्ये या मातदारसंघातून जलिस अहेमद हे नवीन चेहरा म्हणून समोर आले आहे. डि-24 न्यूजला बोलताना त्यांनी या मतदारसंघातून इच्छुक असल्याचे सांगितले.
What's Your Reaction?
![like](https://d24news.in/assets/img/reactions/like.png)
![dislike](https://d24news.in/assets/img/reactions/dislike.png)
![love](https://d24news.in/assets/img/reactions/love.png)
![funny](https://d24news.in/assets/img/reactions/funny.png)
![angry](https://d24news.in/assets/img/reactions/angry.png)
![sad](https://d24news.in/assets/img/reactions/sad.png)
![wow](https://d24news.in/assets/img/reactions/wow.png)