गृहनिर्माण संस्था पदाधिकाऱ्यांची बैठक, लोकशाही बळकट करण्यासाठी सहयोग द्यावे - जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

 0
गृहनिर्माण संस्था पदाधिकाऱ्यांची बैठक, लोकशाही बळकट करण्यासाठी सहयोग द्यावे - जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

गृहनिर्माण संस्था पदाधिकाऱ्यांची बैठक

लोकशाही बळकटीकरणासाठी सहयोग द्यावा-जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

छ. संभाजीनगर(डि-24 न्यूज )दि.11(डि-24 न्यूज) विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार गृहनिर्माण संस्थांमध्ये स्थापन करावयाच्या मतदान केंद्र स्थापनेसाठी संमती देऊन पदाधिकाऱ्यांनी लोकशाही बळकटीकरणासाठी सहयोग द्यावा,असे आवाहन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज केले.

 जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात गृहनिर्माण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी व उपजिल्हा निवडणूक अधिकारी देवेंद्र कटके यांनी या पदाधिकाऱ्यांना संबोधित केले. यावेळी उपस्थित ५३ संस्थांपैकी २९ जणांनी त्यांच्या संस्थेत मतदान केंद्र स्थापन करण्यास सहमती दर्शविली. आणखीनही काही संस्थांना मतदान केंद्र स्थापन करण्यास सहमती दर्शवायची असल्यास त्यांनी शनिवार दि.१३ पर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयात निवडणूक शाखेत आपले अर्ज द्यावे असे आवाहनही यावेळी करण्यात आले.

जिल्हाधिकारी स्वामी म्हणाले की, गृहनिर्माण संस्थेत मतदान केंद्र स्थापना करता आल्यास मतदान प्रक्रिया अधिक सुलभ होईल. शहरातील इतर भागातही वार्ड ऑफिसर व अन्य क्षेत्रिय अधिकाऱ्यांनी संस्थांची माहिती द्यावी. अशाप्रकारे मतदान करणे हे सोपे व सहज होण्यासाठी देत असलेला सहयोग हा लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी असल्याचे जिल्हाधिकारी स्वामी यांनी सांगि

तले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow