मुख्यमंत्र्यांचे मुस्लिम विरोधी आक्षेपार्ह विधान, उबाठा गटाची निवडणूक आयोगाकडे तक्रार...?

 0
मुख्यमंत्र्यांचे मुस्लिम विरोधी आक्षेपार्ह विधान, उबाठा गटाची निवडणूक आयोगाकडे तक्रार...?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मुस्लिम विरोधी वक्तव्य, शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांची 

निवडणूक आयोगाकडे तक्रार

औरंगाबाद आणि उस्मानाबाद नामांतरावराचा निर्णय मुख्यमंत्री असताना उध्दव ठाकरे यांनी घेतला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे संदीपान भुमरे यांना श्रेय देत असल्याचा आरोप अंधारे यांनी लावला 

औरंगाबाद, दि.8 (डि-24 न्यूज) काल बजाजनगर येथे झालेल्या सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुस्लिम विरोधी आक्षेपार्ह विधान केल्याने निवडणूक आयोगाने याची दखल घ्यावी व आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करावा अशी तक्रार उबाठा गटाच्या उपनेत्या सुशमा अंधारे यांनी केली आहे. या वक्तव्यामुळे मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. असा आरोप त्यांनी केला आहे. महायुतीचे उमेदवार संदिपान भुमरे यांच्या प्रचारार्थ बजाजनगर येथे मंगळवारी रात्री झालेल्या जाहीर सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी औरंग्याची कबर शिवसेना (उबाठा) पक्षाच्या नेत्यांनी सजवली असे आक्षपार्ह भाषण करून मतदारांमध्ये संभ्रम करीत दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला असून आपण अशी तक्रार निवडणूक आयोगाकडे करीत असल्याचे शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले.

महाविकास आघाडीच्या मध्यवर्ती प्रचार कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी महाविकास आघाडीचे उमेदवार शिवसेना नेते चंद्रकांत खैरे उपस्थित होते.

 पुढे बोलताना सुषमा अंधारे म्हणाल्या की, या सभेत मुख्यमंत्र्यांनी शहरातील मेट्रो, शंभर टक्के शहर स्मार्ट सिटी झाले का?, डीएमआयसीमध्ये अडीच वर्षात किती उद्योग आले..?, बेरोजगारांना किती नोकर्‍या मिळाल्या...?, महिला सुरक्षेसाठी काय केले...? महागाई आणि बेरोजगारीचा किती दर कमी केला आहे यावरची उत्तरे देणे अपेक्षित असताना त्यांनी देवेंद्र फडणवीस यांची कॉपी करू नये, मुख्यमंत्र्यांनी कॉप्या करून पास होण्याचा प्रयत्न करू नये, मुख्यमंत्र्यांनी अभ्यास करून बोलावे, निवडणूक आयोगाने कुणाच्याही दडपणाखाली न येता मुख्यमंत्री आहेत म्हणून त्यांना अभय, तर सामान्य कार्यकर्ता आहेत त्यांना नोटीसा पाठवू, अशा पद्धतीने पक्षपात न करता मुख्यमंत्र्यांच्या विरोधात कालच्या भाषणाबद्दल तक्रार दाखल करून घ्यावी. अन्यथा जर पुढच्या काही काळामध्ये येथे दंगल सदृष्य परिस्थिती निर्माण झालीतर यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच जबाबदार राहतील. असा इशारा सुषमा अंधारे यांनी यावेळी दिला. औरंग्याची कबर शिवसेना (उबाठा) पक्षाच्या नेत्याने सजवली. असे बाष्कळ विधान मुख्यमंत्र्यांनी केल्याबद्दल त्यांच्या विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार करीत असल्याचे सुषमा अंधारे यांनी सांगितले.

2 ते 7 टक्क्यांपर्यत मतदान वाढले

लोकसभा निवडणूकीसाठी दोन टप्प्याचे मतदान पूर्ण झाले. या दोन्ही टप्प्यात झालेल्या मतदानांची टक्केवारी चार दिवसांनी प्रकाशीत करण्यात आली. 2 ते 7 टक्क्यापर्यंत मतदान वाढीव झाल्याने हे चिंताजनक आहे. तीच गोष्ट काल झालेल्या तिसर्‍या टप्प्यातही टक्केवारी वेगळी जाहीर करण्यात आली. त्यावरून स्वायत्त यंत्रणेवरही दडपण आणून पक्षपातीपणा केला जात असल्याचा आरोप सुषमा अंधारे यांनी केला.

मुख्यमंत्र्यांनी संवेदना व्यक्त केली नाही

उस्मानाबाद लोकसभा मतदार संघातील परांडा तालुक्यातील एका बुथसमोर 27 वर्षीय उबाठा गटाच्या कार्यकर्त्याचा निर्घृण बळी गेला. मतदान केंद्रासमोर घडलेल्या घटनेबद्दल मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी संवेदना व्यक्त केली नाही. अशी टिका सुषमा अंधारे यांनी केली. महाविकास आघाडीने 48 जागेतून एकही मुस्लिम उमेदवार दिला नाही याबद्दल नाराजी आहे या प्रश्नावर उत्तर देताना त्यांनी सांगितले एकाही मुस्लिम उमेदवाराने तिकीट मागितले नाही. मंत्री अब्दुल सत्तार हे जेव्हा शिवसेनेत होते तेव्हा त्यांना विधानसभेची उमेदवारी दिली होते. असे त्यांनी सांगितले.

चंद्रकांत खैरे यांनी महायुतीचे उमेदवार संदीपान भुमरे यांच्यावर मतदारसंघात पैसे वाटप करत असल्याचा आरोप केला. पैसे वाटतानाचे व्हिडिओ व्हायरल झाले तरी अधिकारी काही कार्यवाही करत नाही. त्यांच्यावर कोणाचा दबाव आहे.

या पत्रपरिषदेला मराठवाडा सचिव अशोक पटवर्धन, महानगरप्रमुख राजू वैद्य, माजी महापौर नंदकुमार घोडेले, सुदाम मामा सोनवणे, उपजिल्हाप्रमुख कृष्णा पाटील डोणगावकर, आनंद तांदुळवाडीकर, गोपाल बछिरे, प्रा. शिवानंद भानुसे, योगेश मसलगे पाटील आदींची उपस्थिती होती.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow