औरंगाबाद, उस्मानाबाद नामांतर, न्यायालयाच्या निर्णयाचे मुख्यमंत्र्यांनी केले स्वागत...!

औरंगाबाद, उस्मानाबाद नामांतर, न्यायालयाच्या निर्णयाचे मुख्यमंत्र्यांनी केले स्वागत...
औरंगाबाद, दि.8(डि-24 न्यूज) औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचे धारशिव या दोन्ही नावांना उच्च न्यायालयाने मान्यता दिल्याचा आज निर्णय दिल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या निर्णयाचे स्वागत करत आभार मानले आहेत. मुंबई उच्च न्यायालयाने न्यायालयाने विरोधकांच्या याचिका फेटाळल्या, याबद्दल तमाम संभाजीनगर आणि धाराशिवकरांचे अभिनंदन करत, बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न आज खऱ्या अर्थाने पूर्ण झाले याचे समाधान आहे. उच्च न्यायालयानेही लोकांच्या भावना, जनतेचा आवाज लक्षात घेऊन मेरीटवर हा निर्णय दिला आहे., अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
महायुतीचे उमेदवार संदिपान भुमरे यांच्या प्रचारार्थ ते शहरात आले होते, आज 8 मे रोजी न्यायालयाचा निर्णय आला, त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, आज अतिशय मोठा निर्णय झालेला आहे. छत्रपती संभाजीनगर नावाला विरोध करणाऱ्यांना हि एक मोठी चपराक लागलेली आहे. संभाजीनगर हा शिवसेना आणि महायुतीचा बालेकिल्ला आहे. बाळासाहेबांचे प्रेम या शहरावर होते. छत्रपती संभाजीनगरवासियांचे प्रेम हे बाळासाहेबांवर होते. शहराचे नाव छत्रपती संभाजीनगर व्हावे, ही बाळासाहेबांची मनापासून इच्छा होती. त्यांचे स्वप्न आज साकार झाले आहे. परंतू अडीच वर्ष ज्यांनी सरकार चालविले, बाळासाहेबांचा वारसा सांगणारे, बाळासाहेबांच्या संपत्तीचे वारस सांगणाऱ्यांनी, जेव्हा आम्ही सरकारमधून बाहेर पडलो, तेव्हा घाईगडबडीमध्ये दाखवण्यासाठी संभाजीनगर नावाचा डाव रचला. मात्र त्यांच्याकडे बहुमत नव्हते, ते आमच्याकडे होते, म्हणून आम्ही सरकार स्थापन केल्यानंतर हा निर्णय घेतला. त्याचा केंद्राकडे पाठपुरावा केला. हा उच्च न्यायालयाने त्यावर शिक्कामोर्तब केले. हा संभाजीनगरवासियांचा विजय आहे. छत्रपती संभाजीनगरची जनता या महाविकास आघाडीला धूळ चारल्याशिवाय राहणार नाही. अशी टिकाही त्यांनी केली.
मी जिकडे जातो, तिकडे यश मिळते, कालपासून मी इकडे आहे, इथे सभा घेतल्या आहेत. आता माझ्यावर टिका होईल, दोन दोन दिवस मुख्यमंत्री छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाण मांडून बसलो. त्यानंतर मी कार्यक्रम करूनच जातो. ज्याचा कुणाचा कार्यक्रम व्हायचा तो होईल., आणि महायुतीचे उमेदवार संदिपान भुमरे हे प्रचंड मताधिक्याने विजयी होतील. महायुतीचे सर्व पदाधिकारी शहरात, जिल्ह्यात जोमाने काम करत आहेत.,असे म्हणत खैरेंवर मुख्यमंत्र्यांनी टिका केली. शरद पवार यांच्या, सर्व समविचारी पक्ष हे आगामी काळात काँग्रेसमध्ये विलीन होतील, या वक्तव्याकडे मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले असता, ते म्हणाले की, पवार साहेब मोठे नेते आहेत. ते सूचक वक्तव्य करत असतात. आज उबाठाची पण काँग्रेस झालेली आहे. ते काँग्रेसची बोली बोलू लागले आहे.आता फक्त औपचारिकता बाकी आहे, असे उत्तर दिले.
What's Your Reaction?






