बदलापूरच्या घटनेच्या निषेधार्थ महीला काँग्रेस रस्त्यावर, गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी
 
                                बदलापूरच्या घटनेच्या निषेधार्थ महीला काँग्रेस रस्त्यावर, गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी
छ.संभाजीनगर(औरंगाबाद) दि.22(डि-24 न्यूज)
बदलापूरच्या बाल लैंगिक अत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ आज क्रांतीचौकात महीला काँग्रेसच्या शहराध्यक्ष दिपाली मिसाळ यांच्या नेतृत्वाखाली तीव्र निदर्शने करण्यात आली. महीलांना पंधराशे रुपये नकोत तर सुरक्षा हवी अशी घोषणाबाजी यावेळी करण्यात आली. गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. नराधमाला फाशी द्या अशी मागणीही याप्रसंगी करण्यात आली.
यावेळी प्रदेश महीला सचिव मिनाक्षी देशपांडे, सुरेखा पानकडे, सरोज मसलगे पाटील, दिक्षा पवार, एड सय्यद अक्रम, योगेश मसलगे पाटील, डॉ.जितेंद्र देहाडे, डॉ.पवन डोंगरे, जयप्रकाश नारववरे, डॉ.सरताज पठाण, बबन डिडोरे, सागर नागरे, मोहित जाधव, रुबीना सय्यद, प्रियांका दाभाडे, विद्या लांडगे, कृष्णा भंडारे, संतोष दिलवाले, शेख अथर, अमेर अब्दुल सलीम, समीना सय्यद, अंजली बांगर, अर्जुन शिंदे, चंद्रप्रभा खंदारे, प्रियांका दाभाडे, अनुराग दाभाडे, मोईन कुरेशी, उत्तम दणके, मुनीर पटेल, श्रीकृष्ण काकडे, प्रमोद सदाशिव, सुमीत नारनवरे, आरती मोकळे, मंगल हिवराळे व शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
What's Your Reaction?
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                            