शहराच्या पाणी प्रश्नावर मनपाच्या अधिका-यांना अंबादास दानवेंनी धारेवर धरले...!
 
                                विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मनपा आयुक्तासमवेत केली चर्चा...
विकासात्मक योजनांची प्रशासन पातळीवरील स्थितीची घेतली माहिती...
छ.संभाजीनगर(डि-24 न्यूज)दि.21(डि-24 न्यूज) राज्याचे विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज शुक्रवार ता. 21 जून रोजी महानगरपालिका आयुक्त जी. श्रीकांत यांच्यासमवेत चर्चा केली. मनपाच्या अख्यातरीत येणाऱ्या शाळा, गुंठेवारी, स्वच्छता, पाणीपुरवठा, हॉस्पिटल व घरकुल सुविधांबाबत प्रशासन पातळीवर असलेल्या स्थितीची माहिती घेतली. तसेच मंत्रालयीन पातळीवर रखडलेल्या कामांची यादी माझ्याकडे सोपवावी त्यांना तातडीने मार्गी लावून घेतो असल्याची सूचना त्यांनी केली.
बंद पडलेल्या मनपाच्या शाळांचे समाययोजन करण्यापेक्षा मराठी माध्यमातून सीबीएससी शाळा सुरु करण्यात याव्या. साधारणतः १४ महानगरपालिकेच्या शाळा बंद करण्यात आल्याची माहिती आयुक्त यांनी दिली. पट संख्या कमी असल्याच्या कारणास्तव मराठी शाळा बंद करून न टाकता त्याऐवजी पालकांच्या मागणीप्रमाणे सीबीएससी मराठी माध्यमांच्या गुणवत्तापर्ण शाळांमध्ये रुपांतरित करण्यात याव्या अशी सूचना दानवे यांनी केली.
शहराच्या पाणी पुरवठ्यावर प्रश्न करत अधिकाऱ्यांना दानवे यांनी धारेवर धरले. जायकवाडी धरणातून शहरासाठी लागणारे पाणी मुबलक स्वरूपात पुरवठा केले जाते. तरीही एक दिवसा आड पाणी न देता पाच ते सहा दिवसांना का ? पाणी मिळते असा जाब त्यांनी अधिकाऱ्यांना विचारला. तसेच पाणी पुरवठ्यात समस्या नसून मनपाच्या वितरण व्यवस्थेत सुधारणा करण्याची आवश्यकता असल्याची सूचना दानवे यांनी केली.
मनपा बांधत असलेले मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटलचे काम जलद गतीने पूर्ण करण्यात यावे. सर्व राजकीय पुढार् यांचे होर्डिंग्स समान वागणूक देऊन काढून टाकावे. सत्ताधाऱ्यांना प्राथमिकता आणि विरोधातील दुय्यमत्व अशी वागणूक देऊ नका असा गंभीर इशारा अंबादास दानवे यांनी दिला.
सुंदरवाडी येथे गरीब लोकांसाठी बांधण्यात येत असलेल्या घरकुलांसाठी लागणाऱ्या जमिनीवरील आरक्षण हटवण्यासाठी मंत्रालयीन पातळीवर मी प्रयत्न करतो. हिंदुहद्यसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचे काम तातडीने पूर्ण करावे. तसेच प्रस्तावित वीर सावरकर यांच्या स्मारकाचे कामकाज सुरू करण्यात यावे अशी सूचना दानवे यांनी केली.
याप्रसंगी बैठकीस आयुक्त जी.श्रीकांत, माजी महापौर त्र्यंबक तुपे, मा.महापौर नंदकुमार घोडेले, महानगरप्रमुख राजु वैद्य, मा.नगरसेवक मकरंद कुलकर्णी व मनपा अधिकारी उपस्थित होते.
What's Your Reaction?
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                            