दबंग अधिकारी मोईन ताशिलदार यांची अल्पसंख्याक आयुक्त पदी नियुक्ती...!
दबंग अधिकारी मोईन ताशिलदार यांची अल्पसंख्याक आयुक्त पदी नियुक्ती...!
छ.संभाजीनगर(औरंगाबाद)दि.21(डि-24 न्यूज) महाराष्ट्र राज्यातील अल्पसंख्याकांच्या सर्वांगिण विकासासाठी शासनाने अल्पसंख्याक आयुक्तालय निर्माण करण्याची घोषणा लोकसभा निवडणुकीच्या अगोदर जाहीर केले होते. मुख्यालय औरंगाबाद शहरात राहणार आहे. आज राज्य शासनाने अल्पसंख्याक विकास मंत्रालयात असलेले उपसचिव कर्तव्यदक्ष अधिकारी मोईन ताशिलदार यांची पहिले आयुक्त म्हणून नियुक्ती केली आहे. लवकरच ते अल्पसंख्याक आयुक्त म्हणून हज हाऊस येथे पदभार स्वीकारतील अशी माहिती सुत्रांनी दिली आहे. लेबर कॉलनी येथे उभारण्यात येणाऱ्या शासकीय इमारतीत अल्पसंख्याक आयुक्त कार्यालय असणार आहे.
मोईन ताशिलदार यांची ओळख दबंग, शिस्तप्रिय, उत्तम प्रशासक म्हणून ओळख आहे. दिड वर्ष त्यांनी महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या सिईओपदी कामगिरी उल्लेखनीय राहिली आहे. वक्फ अधिनियमांची काटेकोर अंमलबजावणी करत मंडळात कामाची गती वाढवून अनियमितता करणा-यांवर धडक कारवाई केली होती. वक्फ बोर्डाच्या जमीनीवर अवैध कब्जा करणा-यांवर कार्यवाही करुन राज्यात खळबळ उडवून दिली होती. 60 अधिकारी कर्मचारी भरती प्रक्रिया यशस्वीपणे राबविली. गैरव्यवहार करणा-या अनेक संस्था विरोधात फौजदारी कारवाई केली. त्यांना अल्पसंख्याक समाजाच्या प्रश्नांची जाण आहे. त्यांनी पदभार सांभाळल्यानंतर निश्चितच समाजाचा सर्वांगीण विकास व 15 कलमी कार्यक्रम राबविण्यात गती प्राप्त होईल व नवीन योजना ते सुरु करतील अशी अपेक्षा आहे.
What's Your Reaction?