रमाई घरकुल योजनेसाठी सामाजिक न्याय विभागाच्या कार्यालयासमोर जोरदार निदर्शने

 0
रमाई घरकुल योजनेसाठी सामाजिक न्याय विभागाच्या कार्यालयासमोर जोरदार निदर्शने

रमाई घरकुल योजनेसाठी सामाजिक न्याय विभागाच्या कार्यालयासमोर जोरदार निदर्शने 

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.6(डि-24 न्यूज) मनपा आयुक्तांनी रमाई घरकुल लाभार्थीची यादी पुन्हा कार्यान्वित करावी, घरकुल लाभार्थ्यांना प्रत्येक महिन्याला अनुदान देण्याची तरतूद करावी या व इतर मागण्यासाठी बीआरएसपी, बहुजन समाज पार्टी आणि रमाई घरकुल बचाव कृती समितीच्या वतीने आज सोमवार दिनांक 6 ऑक्टोबर रोजी दुपारी सामाजिक न्याय विभागाच्या कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली. महापालिकेच्या वतीने शहरात रमाई घरकुल योजना राबविली जात आहे परंतु या योजनेबद्दल लाभार्थ्यांना शंका आहे. त्यातच मनपा आयुक्त जी. श्रीकांत यांनी 31 मे 2025 रोजी मंजूर असलेली लाभार्थ्यांची यादी अध्यादेश काढून रद्द केली. त्यामुळे लाभार्थ्यांमध्ये तीव्र संताप आहे. बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी बहुजन समाज पार्टी आणि रमाई घरकुल कृती समितीच्या वतीने ऑनलाइन आलेले रमाई घरकुलाचे प्रस्ताव तात्काळ निकाली काढावे, रमाई घरकुल लाभार्थ्यांची यादी पुन्हा कार्यनीत करावी, लाभार्थ्यांना प्रत्येक महिन्याला अनुदान देण्याचे तरतूद करावी, घरकुल लाभार्थ्यांचे पहिला टप्पा ते अंतिम टप्प्याचे थकीत अनुदान त्वरित वितरित करावे या मागणीसाठी खोकडपुरा येथील सामाजिक न्याय विभागाच्या कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली. यावेळी कार्यकर्त्यांनी मनपा आयुक्त जी श्रीकांत राज्य सरकार यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून परिसर दणाणून सोडला त्यानंतर एका शिष्टमंडळाने सामाजिक न्याय विभागाचे प्रादेशिक उपायुक्त यांची भेट घेऊन त्यांना मागणीचे निवेदन दिले. यावेळी मनपा आयुक्त यांची बैठक घेऊन मागण्यावर यशस्वी तोडगा काढण्यात येईल असे आश्वासन प्रादेशिक उपयुक्त यांनी शिष्टमंडळाला दिले. रमाई घरकुल योजना संदर्भातील मागण्या मार्गी लागल्या नाही तर यापेक्षा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा शिष्टमंडळातील नेत्यांनी दिला. निदर्शनाचे नेतृत्व बीआरएसपीचे प्रदेश महासचिव अरविंद कांबळे, बहुजन समाज पार्टीचे जिल्हाध्यक्ष विजय बचके, रमाई घरकुल कृती समितीचे मुख्य प्रवर्तक मधुकर ढेपे, मा.नगरसेवक प्रकाश खंदारे, बीआरएसपीचे जिल्हाध्यक्ष विजय शिनगारे, जिल्हा सचिव विष्णु वाघमारे, गब्बू कुरेशी, राहुल साबळे अमोल पवार, विष्णू वाघमारे, अनामी मोरे यांनी केले. यावेळी सचिन महापुरे, सतीश भुजंग, भगवान पवार, कुणाल लांडगे, सलमान पठाण, खालिद शेख, मिलिंद राघवंश, राहुल साळवे, गणेश ठाकूर, सुधाकर भिसे, चंद्रकांत वाघमारे यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow