ईव्हीएम हटावो, बॅलेट पेपर वर निवडणुका घ्या या मागणीसाठी सुरू असलेले आमरण उपोषण स्थगित
ईव्हीएम हटावो, बॅलेट पेपर वर निवडणुका घ्या या मागणीसाठी सुरू असलेले आमरण उपोषण स्थगित
औरंगाबाद, दि.18(डि-24 न्यूज) ईव्हीएम हटावो, बॅलेट पेपर वर देशात निवडणुका घ्या. 2024 ची लोकसभा निवडणूक बॅलेट पेपर वर निवडणुक आयोगाने घ्यावी या मागणीसाठी 28 नोव्हेंबर पासून विभागीय आयुक्त कार्यालयासमोर कायदेतज्ज्ञ अनंत केरबाजी भवरे आमरण उपोषणाला बसले होते. मागिल 21 दिवसांपासून फक्त पाण्यावर त्यांनी उपोषण केले. त्यांची तब्येत खालावली असताना शहरातील कायदेतज्ज्ञ, वकिल संघांचे सदस्य व विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी त्यांची भेट घेऊन आज दुपारी दोन वाजता उपोषण स्थगित करण्याची विनंतीला मान देत ज्यूस पिऊन त्यांनी 21 व्या दिवशी आपले उपोषण सोडले.
यावेळी एड डि.व्हि.खिल्लारे, एड अनिलकुमार बस्ते यांनी आपले विचार मांडले. ईव्हीएमविरोधात जनजागृती करत राहणार. संविधान वाचवण्यासाठी पण जनजागृती केली जाईल. 2024 ची लोकसभा निवडणूक ईव्हीएमवर न घेता बॅलेट पेपर वर घ्यावे या मागणीवर ठाम आहे. सर्वोच्च न्यायालयात या याचिकेवर दोन आठवड्यात सुनावणी होणार आहे याची प्रतिक्षा करत आंदोलन पुन्हा सुरू करणार असल्याचे अनंत भवरे यांनी यावेळी जाहीर केले.
याप्रसंगी एड डि.व्हि.खिल्लारे, एड अनिलकुमार बस्ते, चंद्रमुखी गाडेकर, सदाशिवे, ठोके ताई, लहाने ताई, मनिषा भवरे, सुदाम मगर, इंजि. वाजेद कादरी, पाशू सर, नूर साहेब आदी उपस्थित होते.
What's Your Reaction?