मुस्लिम समाजाला जास्तीत जास्त उमेदवारी देण्यासाठी मुंबईत झाली महत्वाची बैठक

 0
मुस्लिम समाजाला जास्तीत जास्त उमेदवारी देण्यासाठी मुंबईत झाली महत्वाची बैठक

मुस्लिम समाजाला जास्तीत जास्त उमेदवारी देण्यासाठी मुंबईत झाली महत्वाची बैठक

मुंबई, दि.19(डि-24 न्यूज) विधानसभा निवडणुकीत राज्यातील जास्तीत जास्त मुस्लिम नेत्यांना उमेदवारी द्यावी. महाविकास आघाडीच्या वतीने निवडून आणण्यासाठी प्रयत्न करावे व सत्तेत सहभागी करून घेण्यासाठी प्रयत्न करावे या उद्देशाने राज्यातील काँग्रेस नेत्यांची महत्वाची बैठक घेण्यात आली. हि बैठक घेण्यासाठी काँग्रेसचे नेते एम.एम.शेख यांनी पुढाकार घेतला. गांधीभवन येथे झालेल्या बैठकीत खासदार नसीर हुसेन यांनी ग्वाही दिली की जास्तीत जास्त मुस्लिम उमेदवार देण्यासाठी व सत्तेत सहभागी करून घेण्यासाठी पक्षाच्या वतीने प्रयत्न केले जातील.

याप्रसंगी माजी खासदार हुसेन दलवाई, आमदार अमीन पटेल, युसुफ अबरानी, हुसना बानो खलिफे, इब्राहिम भाईजान, निजामोद्दीन राई, डॉक्टर नदीम, अनिस कुरेशी, मोईज शेख, अब्दुल सत्तार, डॉ.जफर अहमद खान, युसुफ शेख, युसुफ खान, खालिद पठाण, हामद चाऊस, अॅड मुजाहिद खान, इरफान पटेल, अब्दुल जब्बार, इब्राहिम पठाण, शमीम खान, जव्वाद चिखलेकर, कैसर आझाद व राज्यातील प्रमुख नेते उपस्थित होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow