माझा मुकाबला एमआयएम सोबत - आमदार प्रदीप जैस्वाल

 0
माझा मुकाबला एमआयएम सोबत - आमदार प्रदीप जैस्वाल

माझा मुकाबला एमआयएम सोबत, मतदार संघात केली 500 कोटींची विकासकामे- आमदार प्रदीप जैस्वाल

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.19(डि-24 न्यूज) औरंगाबाद मध्य विधानसभेचे विद्यमान आमदार प्रदीप जैस्वाल यांनी आज महायुती सरकारने प्रत्येक क्षेत्रात केलेल्या विकासकामांची माहिती दिली. मतदारसंघात महायुती सरकारच्या कार्यकाळात 500 कोटींची विकासकामे केली असल्याचा दावा त्यांनी केला. या निवडणुकीत एमआयएमशी मुकाबला आहे. उबाठाचे तिकीट किशनचंद तनवानी यांना मिळाले तरीही मीच मोठ्या मताधिक्याने निवडून येईल असा दावा त्यांनी पत्रकार परिषदेत केला.

सन 2014 च्या निवडणुकीत या मतदारसंघातून एमआयएमचे इम्तियाज जलील यांचा विजय झाला होता तीच परिस्थिती या निवडणुकीत आहे या प्रश्नाचे उत्तर देताना जैस्वाल म्हणाले त्यावेळी शिवसेना व भाजपाची युती नव्हती म्हणून पराभव झाला होता यावेळी भाजपा, राष्ट्रवादी अजित पवार गट व रिपाइं आठवले गट असल्याने ताकत वाढलेली असल्याने व मतदारसंघात केलेली विकासकामे यश मिळवून देईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी भाजपचे शहराध्यक्ष शिरीष बोराळकर व राष्ट्रवादीचे पदाधिकारी उपस्थित होते.

जैस्वाल यांनी सांगितले विकासकामे करताना जातपात बघितली नाही मुस्लिम बहुल भाग सईदा काॅलनीत, रोजाबाग ईदगाहचे व अन्य वार्डातील विकासकामे केली.

शहरात नवीन पाणीपुरवठा योजना 2740 कोटींची निधीचे काम प्रगतीपथावर आहे. भडकलगेट येथे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर व टिवी सेंटर चौक येथे छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याचे सुशोभीकरणाचे काम सुरू आहे. जटवाडा रोड अंबरहिल, सईदा काॅलनी, एकतानगर, हर्सुल, सुरेवाडी, मयुरपार्क, पहाडसिंगपूरा, भावसिंगपूरा व शहराच्या जून्या भागातील जूनी मलनिसारण वाहिन्या बदलण्याकरीता 187 कोटीं रुपये मंजूर केले. विविध वार्डात कोट्यवधी रुपयांची रस्त्यांचे सिमेंट काँक्रीट कामे केली काही प्रगतीपथावर आहे. पाण्याचे पाइपलाइन टाकण्याचे काम सुरू आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow