मनोज जरांगे पाटील यांनी घेतली मौलाना सज्जाद नोमानी यांची भेट

 0
मनोज जरांगे पाटील यांनी घेतली मौलाना सज्जाद नोमानी यांची भेट

मनोज जरांगे पाटील यांनी घेतली मौलाना सज्जाद नोमानी यांची भेट...

जरांगेंनी सांगितले सत्तापरिवर्तन करण्यासाठी हि भेट 

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.20(डि-24 न्यूज) आज मनोज जरांगे पाटील व मुस्लिम धर्मगुरु सज्जाद नोमानी यांची भेट झाली. विधानसभा निवडणुकीमुळे सध्या राजकारण तापत असताना या दोघांच्या भेटीमुळे अधिक महत्त्व आले आहे. जरांगे यांनी भेट झाल्यानंतर सांगितले मौलाना सज्जाद नोमानी हे एक मोठे मुस्लिम धर्मगुरु आहे. त्यांचे मुस्लिम समाजात वर्चस्व आहे. आपल्या धर्मावर अभियान असला पाहिजे पण मानवता हेच शिकवते जातीच्या भींती बाजूला ठेवून गरीबांना न्याय कसा मिळवून देता येईल म्हणून एकत्र येऊन सत्ता परिवर्तन करण्यासाठी या बैठकीत चर्चा झाली. राजकीय व सामाजिक विषयांवर चर्चा झाली. नोमानी हे तीन दिवसांत राज्यातील मुस्लिम धर्मगुरु यांच्याशी चर्चा करून आपला निर्णय कळवणार आहे. मराठा, धनगर, मुस्लिम व अन्य जाती धर्मातील लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी काय चांगले करता येईल त्यासाठी आमचे प्रयत्न आहे. काही दिवसांपूर्वी एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांचीही भेट जरांगेसोबत झाली होती.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow