विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्ष दलित समाजाला किती जागा देणार...?
विधानसभा निवडणूकीत कॉंग्रेस पक्ष दलित समाजाला किती जागा देणार....?
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.20(डि-24 न्यूज )
लोकसभेच्या नुकत्याच झालेल्या निवडणूकीत खा. राहुल गांधी यांनी संविधान बचावचा जो नारा दिला तो समाजाला पटला व संपूर्ण दलित समाज कांग्रेस पक्षाच्या पाठीमागे उभा राहिला. राज्यातील 5 राखीव मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी झाले. त्यात कांग्रेस पक्षाकडे लातूर, अमरावती, सोलापूर, रामटेक तथा शिवसेनेला ( उबाठा ) शिर्डी मतदारसंघात विजय मिळाला. या 5 जागेपैकी फक्त एका ठिकाणी ( अमरावती ) येथे बौद्ध समाजाचा उमेदवार होता.
राज्यात दलितांमधे बौद्ध समाज सर्वाधिक आहे. विधानसभेचे 29 मतदारसंघ अनु.जाती साठी राखीव आहेत. विधानसभेच्या निवडणूकीत देखील समाज कांग्रेस पक्षाला मतदान करायला तयार आहे परंतू कॉंग्रेस पक्ष किती राखीव जागा लढवणार आहे ते अजून निश्चित नाही.
मराठवाड्यात 6 मतदारसंघ राखीव आहेत औरंगाबाद पश्चिम, बदनापूर - जालना, देगलूर - नांदेड , केज - बीड , उदगीर - लातूर , उमरगा - उस्मानाबाद. यापैकी किमान 3 जागा कांग्रेस पक्षाने लढवाव्यात. मराठवाड्याची राजधानी औरंगाबाद हे दलित चळवळीचे केंद्र आहे. परमपूज्य भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे. औरंगाबाद येथे कुठलेही आंदोलन झाले किंवा एखादी घटना घडली तर त्याचा संदेश संपूर्ण राज्यात जातो.
कांग्रेस पक्षामधे जो दलित कार्यकर्ता एकनिष्ठेने काम करतो त्याला संधी कधी मिळणार. त्याला संधी द्यायची वेळ आली तर जागा मित्रपक्षाला द्यायच्या मग कॉंग्रेस पक्षामधे नविन दलित नेतृत्व कसे व कधी तयार होणार. जागावाटप समितीमधे राखीव जागांची जबाबदारी कुठल्या नेत्यावर देण्यात आली होती व त्या नेत्याने काय शिफारशी केल्या हे सुद्धा तपासले पाहिजे. कारण कॉंग्रेस पक्षातील प्रस्थापित दलित नेतृत्वाला नविन नेतृत्व तयार होऊ द्यायचे नाही अशी शंका पक्षातील युवक पदाधिकाऱ्यांना येत आहे. अशी खंत अनुसूचित जाती जमातीचे नेते डॉ.जितेंद्र देहाडे यांनी व्यक्त केली आहे.
What's Your Reaction?