भाजपाने दिला फुलंब्रीतून महीला उमेदवार, सावे, बंब, कुचे, लोणीकर, दानवेंना पुन्हा उमेदवारी

 0
भाजपाने दिला फुलंब्रीतून महीला उमेदवार, सावे, बंब, कुचे, लोणीकर, दानवेंना पुन्हा उमेदवारी

भाजपाने दिला फुलंब्रीतून महीला उमेदवार, सावे, बंब, कुचे, लोणीकर, दानवेंना पुन्हा उमेदवारी

मुंबई,दि.20(डि-24 न्यूज)

आज भाजपाच्या केंद्रीय निवडणूक समितीने महाराष्ट्र विधानसभा मतदारसंघातील 99 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. यामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नागपूर दक्षिण-पश्चिम, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना कामठी मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) जिल्ह्यातील फुलंब्री मतदारसंघाकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. हरिभाऊ बागडे हे राज्यपाल झाल्यानंतर त्यांचा वारसदार कोण... अनेक दिग्गज येथून उमेदवारी मिळावी यासाठी इच्छुक होते परंतु या मतदारसंघातून श्रीमती अनुराधाताई अतुल चव्हाण यांना उमेदवारी दिली आहे. विजय औताडे यांचा पत्ता कट झाला आहे. औरंगाबाद पूर्व मतदारसंघातून विद्यमान मंत्री अतुल सावे यांना तिस-यांदा पक्षाने संधी दिली आहे. प्रशांत बंब यांना गंगापूर-खुलताबाद तर नारायण कुचे यांच्यावर पुन्हा पक्षाने विश्वास दाखवला आहे.

भोकरदन संतोष दानवे, परतूर बबनराव लोणीकर, जिंतूर श्रीमती मेघना बोर्डीकर, हिंगोली तानाजी मुटकुले, शहादा राजेश उदयसिंह पाडवी, नंदुरबार विजयकुमार गावित, धुळे शहर अनुप अग्रवाल, सिंदखेडा जयकुमार रावल, बगलान(अजजा) दिलीप मंगलू बोरसे, चंदवड डॉ.राहुल दौलतराव अहेर, नाशिक पूर्व एड राहुल उत्तमराव ढिकाले, नाशिक पश्चिम श्रीमती सीमाताई महेश हिरे, नालासोपारा राजन नाईक, भिवंडी पश्चिम महेश प्रभिकर चौघुले, मुरबाद किसन शंकर कथोरे, कल्याण पूर्व श्रीमती सुलभा कालू गायकवाड, शिरपूर(अजजा) काशीराम वेचन पावरा, रावेर अमोल जावळे, भुसावळ(अजा) संजय वामन सावकारे, जळगाव शहर सुरेश दामू भोले(राजुमामा), चिळिसगांव मंगेश रमेश चव्हाण, जामनेर गिरीश दत्तात्रय महाजन, चिखली श्रीमती श्वेता विद्याधर महाले, खामगाव आकाश पांडुरंग फुंडकर, जळगाव जामोद डॉ.संजय श्रीराम कुटे, अकोला पूर्व रणधीर प्रल्हादराव सावरकर, धामणगाव रेल्वे प्रताप जनार्दन अडसद, अचलपूर प्रविण तायडे, देवली राजेश बकाने, हिंगनघाड समीर त्र्यंबकराव कुणावार, वर्धा डॉ.पंकज राजेश भोयर, हिंगना समीर दत्तात्रय मेघे, नागपूर दक्षिण मोहन गोपालराव माते, नागपूर पूर्व कृष्ण पंचम खोपडे, तिरोरा विजय भरतलाल रहांगडाले , गोंदीया विनोद अग्रवाल, अमगांव(अजजा) संजय हनवंतराव पुरम, बल्लारपूर सुधीर सच्चिदानंद मुनगंटीवार, चिमूर बंटी भांगडिया, वानी संजीवरेड्डी बापुराव बोडकुरवार, रालेगांव डॉ.अशोक रामाजी उडके, यवतमाळ मदन मधुकरराव येरवर, किनवट भीमराव रामजी केरम, भोकर सुश्री श्रीजया अशोक चव्हाण, नायगांव राजेश संभाजी पवार, मुखेड तुषार राठोड, डोंबिवली रवींद्र दत्तात्रय चव्हाण, ठाणे संजय मुकुंद केलकर, ऐरोली गणेश नाईक, बेलापूर श्रीमती मंदा विजय म्हात्रे, दहिसर श्रीमती मनीषा अशोक चौधरी, मुलुंड मिहिर कोटेचा, कांदिवली पूर्व अतुल भातखळकर, चारकोप योगेश सागर, मलाड पश्चिम विनोद शेलार, गोरेगाव श्रीमती विद्या जयप्रकाश ठाकूर, अंधेरी पश्चिम अमीत सातम, विले पार्ले पराग अलवणी, घाटकोपर पश्चिम राम कदम, वांद्रे पश्चिम एड आशिष शेलार, सायन कोलिवाडा कैप्टन आर.तमिल सेल्वन, वडाला कालिदास नीळकंठ कोळंबकर, मालबार हिल मंगल प्रभात लोढा, कोलाबा एड राहुल सुरेश नार्वेकर, पनवेल प्रशांत ठाकूर, उरान महेश बाल्दी, दौंड एड राहुल सुभाष कुल, चिंचवड शंकर जगताप, भोसरी महेश(दादा) किसन लांडगे, शिवाजीनगर सिध्दार्थ शिरोळे, कोथरूड चंद्रकांत दादा बच्चू पाटील, पार्वती श्रीमती माधुरी सतीश मिसाळ, शिर्डी राधाकृष्ण विखे पाटील, शेवगाव श्रीमती मोनिका राजीव राजळे, राहुरी शिवाजीराव भानुदास कर्डिले, श्रीगोंदा श्रीमती प्रतिभा पाचपुते, कर्जत जामखेड प्रो.राम शंकर शिंदे, केज(अजा) श्रीमती नमिता मुंदडा, निलंगा संभाजी पाटील निलंगेकर, औसा अभिमन्यू पवार, तुळजापूर राणा जगजितसिंग पद्मसिंह पाटील, सोलापूर शहर उत्तर विजयकुमार देशमुख, अक्कलकोट सचिन कल्याणशेट्टी, सोलापूर दक्षिण सुभाष देशमुख, मान जयकुमार भगवानराव गोरे, कराड दक्षिण अतुल सुरेश भोसले, सातारा छत्रपती शिवेंद्र राजे भोसले, कंकावली नितेश नारायण राणे, कोल्हापूर दक्षिण अमल महाडिक, इचलकरंजी राहुल प्रकाश आवाडे, मीरज(अजा) सुरेश खाडे, सांगली सुधीर दादा गाडगीळ यांना भाजपाने उमेदवारी दिली आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow