गोदाकाठातील नागरीकांना सतर्कतेचा इशारा, जायकवाडीचे दरवाजे उघडणार...

गोदाकाठेतील नागरीकांना सतर्कतेचा इशारा, उद्या जायकडीचे 18 दरवाजे उघडणार...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.20(डि-24 न्यूज) -
उद्या सकाळी जायकवाडी धरणाचे एकुण 18 दरवाजे प्रत्येकी 0.5 फुटाने उघडण्यात येणार असून एकूण 9432 Cusecs विसर्ग सुरु होणार आहे. धरणात पाण्याची होणारी आवक पाहता विसर्ग कमी अथवा जास्त करण्याची कार्यवाही करण्यात येईल. तरी कुणीही नदीपात्रात प्रवेश करु नये व कुठलीही जिवीत व वित्त हानी होऊ नये या करीता नदीकाठाच्या गावातील नागरीकांनी खबरदारी घ्यावी हि विनंती. सकाळी 6.00 ते 7.00 वाजता दरम्यान जायकवाडी धरणाच्या सांडव्याद्वारे गोदावरी नदी पात्रात 9432 क्युसेक विसर्ग सुरु करण्यात येणार आहे. नदीकाठच्या गावांनी सतर्क राहण्याचे आवाहन जायकवाडी पाटबंधारे विभाग कार्यकारी अभियंता, पैठण यांनी केले आहे.
What's Your Reaction?






