पोलिसांच्या विरोधात मोर्चा काढण्याचा इम्तियाज जलिल यांचा इशारा, सिटी चौक पोलिसांना कार्यवाईची मागणी...

 0
पोलिसांच्या विरोधात मोर्चा काढण्याचा इम्तियाज जलिल यांचा इशारा, सिटी चौक पोलिसांना कार्यवाईची मागणी...

पोलिसांच्या विरोधात उद्या मोर्चा काढण्याचा इशारा, हल्ला करणा-यांना जामीन

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.9(डि-24 न्यूज) - प्रभाग क्रमांक 14 मध्ये परवानगी घेऊन पदयात्रा उमेदवारांच्या प्रचारार्थ काढली. बक्कलगुडा जीन्सी येथे आल्यावर दुसऱ्या प्रभागात प्रचाराला जात असताना माझ्या गाडीवर हल्ला करणारे व्हिडिओ सर्व माध्यमांनी प्रसारित केले. हल्लेखोर कलिम कुरेशी यांच्या इशा-यावरुन गाडीवर चढले. त्यांच्या हातात बर्फ तोडण्याचा सुवा होता. या हल्लेखोरात कलिम कुरेशी यांचा मुलगाही होता. स्कुटरवरुन जाणा-या एका व्यक्तीने माझ्या गाडीवर चढून हमला रोखला. माझ्यावर जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न होता. गाडीवर हाताने मारताना सर्वांनी पाहिले. सिटी चौक पोलिसांना हे दिसले नाही का...? पोलिस आयुक्त यांना पत्र दिले तरीही आतापर्यंत त्या हल्लेखोरांवर गुन्हा दाखल करण्यात आला नाही. याचा जाब विचारण्यासाठी सिटी चौक पोलिस ठाण्यात उशिरा रात्री आलो आहे. कलिम कुरेशी यांच्या समर्थकांवर रैलीत झालेल्या वादात जीन्सी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला परंतु माझ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केलेल्या गुंडांवर गुन्हा दाखल करण्यात आला नाही. जीन्सी पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील आरोपिंना पोलिसांचा से येण्याच्या अगोदर जामीन मिळाला. माझ्या गाडीवर हल्ला करणा-या विरोधात गुन्हा दाखल झाला नाही तर पोलिस आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलिल यांनी माध्यमांशी बोलताना दिला आहे. उमेदवार फेरोज खान यांच्या घरासमोर काल बुरखाधारी महीलांनी भाजपाचे स्टिकर लावण्याचा प्रयत्न केला. त्यांना रोखण्याचा प्रयत्न घराच्या महिलांनी केला त्यांची तक्रार सिटी चौक पोलिस ठाण्यात केल्यानंतर तात्काळ एमआयएमचे उमेदवार व कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी तत्परता दाखवली असा आरोप यावेळी इम्तियाज जलिल यांनी केला आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow