सोनम वांगचुक यांच्या उपोषणाला परिवर्तनवादी चळवळीचा सक्रीय पाठिंबा, 20 जूलै रोजी गांधी पुतळा येथे धरणे आंदोलन...

 0
सोनम वांगचुक यांच्या उपोषणाला परिवर्तनवादी चळवळीचा सक्रीय पाठिंबा, 20 जूलै रोजी गांधी पुतळा येथे धरणे आंदोलन...

सोनम वांगचुक यांच्या उपोषणाला शहरातील परिवर्तनवादी चळवळींचा सक्रिय पाठिंबा...!!

सोमवारी गांधी पुतळ्यासमोर धरणे आंदोलन करणार...!!!

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.16(डि-24 न्यूज)- नीट परीक्षेतील गैरप्रकारांची जबाबदारी म्हणून केंद्रीय शिक्षण मंत्र्याने राजीनामा द्यावा या प्रमुख मागणीसाठी, प्रख्यात पर्यावरणवादी व शिक्षणतज्ञ सोनम वांगचुक हे गेले 18 दिवसापासून दिल्ली येथे बेमुदत उपोषण करीत असून, त्यास शहरातील परिवर्तनवादी चळवळींनी पाठिंबा व्यक्त केला आहे.

शहरातील पुरोगामी, परिवर्तनवादी व लोकशाहीवादी पक्ष संघटनांची बैठक दि.15 जुलै रोजी महात्मा गांधी भवन येथे संपन्न झाली तेंव्हा, वांगचुक यांचे उपोषण व विद्यार्थ्यांचे आंदोलनाला बिनशर्त पाठिंबा व्यक्त करण्यात आला.

दिवसेदिवस वांगचुक यांची तब्येत अधिकाधिक खालावत असून, त्यांचे प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त करण्यात आली.

देशातील तरुण पिढीच्या भवितव्याशी निगडीत असलेल्या या अत्यंत संवेदनशील प्रश्नावर केंद्र सरकार बघ्याची भूमिका घेत आहे हे लोकशाही कार्यपद्धतीला मोठे आव्हान असल्याची नोंद करून, सरकारच्या या आडमुठ्या - लोकशाही विरोधी व संवेदनशून्य वर्तणुकीचा बैठकीत तीव्र निषेध करण्यात आला.

सोनम वांगचुक यांचे तब्येतीला निर्माण झालेला धोका लक्षात घेवून या प्रकरणी राष्ट्रपतींनी तात्काळ हस्तक्षेप करावा म्हणून त्यांना निवेदन पाठविण्याची निर्णय बैठकीत घेण्यात आला.

ज्यांना शक्य असेल त्यांनी दि.20 जुलै रोजी दिल्लीत निघणाऱ्या मोर्च्यात सहभागी व्हावे आणि अन्य परिवर्तनवादी चळवळीतील कार्यकर्त्यांनी सोमवारी सकाळी 10 वाजता शहागंज येथील गांधी पुतळ्यासमोर होणाऱ्या धरणे आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.

गांधी भवन येथे झालेली बैठक कष्टकऱ्यांचे नेते साथी सुभाष लोमटे यांचे अध्यक्षतेखाली पार पडली ज्यात लाल निशाण पक्षाचे कॉ. भीमराव बनसोड, मराठवाडा लेबर युनियनचे ॲड. सुभाष सावंगीकर, भारत जोडो अभियान चे साथी शेख खुर्रम, टेलिफोन कर्मचारी संघटनेचे साथी रंजन दाणी, गांधी भवनचे संचालक प्रा. मच्छिंद्र गोरडे, प्रा. फारुख खान, आपचे प्रा. वैजनाथ राठोड, एम. पी. जेचे मेराजभाई सिद्दिकी, सर्वोदय मंडळाच्या प्रा. गीता कोल्हटकर, युवा पत्रकार शेख अन्वर, इंद्रकुमार जेवारीकर.. इ. चा समावेश होता.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow