D24NEWS च्या बातमीवर शिक्कामोर्तब, इम्तियाज जलील यांना पूर्व मधून उमेदवारी...!

D24NEWS च्या बातमीवर शिक्कामोर्तब, इम्तियाज जलील यांना पूर्व मधून उमेदवारी...!
या मतदारसंघातून आता अतुल सावे, एम.के.देशमुख, इम्तियाज जलील यांच्यामध्ये तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे...रोशनगेटवर कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष साजरा केला...
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.26(डि-24 न्यूज) एम
आयएमचे सुप्रीमो बॅ. खासदार असदोद्दीन ओवेसींनी एक्स हैंडलवर प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांची औरंगाबाद पूर्व विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली व दोन्ही उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन केले आहे. मध्य मधून काल औरंगाबाद मध्य नासेर सिद्दीकी यांना उमेदवारी दिली तर पश्चिम मधून आतापर्यंत उमेदवार दिला नाही. इम्तियाज जलील यांना पूर्व मधून उमेदवारी मिळेल हि बातमी डि-24 न्यूजने दिली होती त्या बातमीवर शिक्कामोर्तब झाले असल्याने विश्वासार्हता असल्याने वाचकवर्ग खुश आहेत. इम्तियाज जलील यांना उमेदवारी मिळाल्यानंतर कार्यकर्त्यांचा सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
What's Your Reaction?






