रिपाइं आठवले गटाचा महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारावर बहिष्कार...!
रिपाइंचा (आठवले) गटाचा महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारावर बहिष्कार...
पक्षाला महाराष्ट्रात एकही जागा न सोडल्याने संताप
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद),दि.26(डि-24 न्यूज) महायुतीने विशेषता भाजपने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाला विधानसभेच्या निवडणूकीत एकही जागा सोडली नसल्याने रिपाईचे कार्यकर्ते संतप्त झाले आहे. आज शनिवारी झालेल्या एका बैठकीत महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेण्यात आला.
भाजप सोबत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ची 2014 पासून युती आहे परंतु भाजपने या पक्षाची अवहेलना केली 2024 च्या विधानसभा निवडणुकीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया भाजप आणि महायुतीने एकही जागा सोडली नाही त्यामुळे राज्यभरातील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्यांमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज शनिवारी शहर संपर्क कार्यालयात प्रदेश कार्याध्यक्ष बाबुराव कदम यांच्या अध्यक्षतेखाली पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली या बैठकीत कार्यकर्त्यांनी संतप्त भावना व्यक्त केला तर काही कार्यकर्त्यांनी भाजप सोबत युती तोडावी असे हे मनोगत व्यक्त केले. या बैठकीत बोलताना प्रदेश कार्याध्यक्ष बाबुराव कदम म्हणाले 2014 पासून भाजपसोबत रिपाईची युती आहे या कार्यकाळात भाजपने रिपाईला एकही जागा दिली नाही. लोकसभा निवडणुकीत शिर्डीचे जागा मागितली तीही दिली नाही. एमएलसी मागितली तेही दिली नाही. महामंडळावर कार्यकर्त्याच्या नियुक्तीही नाही त्यामुळे भाजपसोबत किती दिवस फरफटत जाणार, विधानसभेच्या निवडणुकीतही पक्षाने सुरुवातीला बारा जागा मागितल्या किमान पाच जागा तरी द्यावा अशी अपेक्षा पक्षनेते केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केली. परंतु एकही जागा पक्षाला सोडली नाही त्यामुळे महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांमध्ये संतापाची भावना आहे. भाजप पेक्षा काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस बरी असे म्हणण्याची वेळ आली आहे. कारण या पक्षांनी रिपाईचा मान सन्मान केला त्यांना मंत्रीपद आमदार, खासदार महापौर ही पदे दिली. पक्षाला एकही जागा सोडली नाही त्यामुळे यापुढे महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षाचे नेते रामदास आठवले जो निर्णय घेईल तो सर्वच कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना मान्य राहील असेही ते म्हणाले. यावेळी मिलिंद शेळके, दौलत खरात, विजय मगरे, शहराध्यक्ष नागराज गायकवाड यांनीही आपल्या भूमिका विशद केल्या आणि महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारावर बहिष्कार घालण्याची जोरदार भूमिका घेतली जो या भूमिकेच्या विरोधात जाईल त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल असा इशाराही यावेळी वरिष्ठ नेत्यांनी दिला. यावेळी कार्यकर्त्यांनी भाजप आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस आणि महायुती सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून परिसर दणाणून सोडला. बैठकीला ज्येष्ठ नेते दौलत खरात मराठवाडा अध्यक्ष मिलिंद शेळके, जिल्हाध्यक्ष विजय मगरे, संजय ठोकळ शहराध्यक्ष नागराज गायकवाड, किशोर थोरात, सुभाष संदर्भात, रवी सोनवणे, सिद्धार्थ भिंगारे, सिद्धार्थ डोंगरदिवे, कुणाल भिंगारे, कुणाल दवंडे, मनोज श्री, देवराज वीर, विश्वनाथ दांडगे, भास्कर दवडे, लक्ष्मण हिवराळे, बाबासाहेब नरवडे, अरविंद अवसरमळ, बाळकृष्ण इंगळे, कृष्णा वावळ, मुकेश गायकवाड, रवी जावळे, रमेश दाभाडे, मनोज भालेराव यांच्यासह मोठ्या संख्येने पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.
What's Your Reaction?