एम.के.देशमुख यांच्या उमेदवारीला कार्यकर्त्यांचा विरोध, उमेदवार बदलण्यासाठी दिला ठिय्या...!
एम.के.देशमुख यांच्या उमेदवारीला विरोध, कार्यकर्त्यांनी भावना व्यक्त करण्यासाठी दिला ठिय्या
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.26(डि-24 न्यूज) आज काँग्रेसची दुसरी यादी जाहीर झाली. त्यामध्ये औरंगाबाद पूर्व विधानसभा मतदारसंघातून एम.के.देशमुख यांचे नाव कार्यकर्त्यांनी बघितल्यानंतर संताप व्यक्त केला जात आहे. या मतदारसंघातून 17 इच्छुक उमेदवार होते त्यांनी पक्ष निरीक्षकांकडे मुलाखत दिली. पक्षाशी व गांधी परिवाराशी ते एकनिष्ठ होते. अनेक वर्षांपासून विविध आंदोलनात सहभागी होऊन केसेस अंगावर घेतले आणि पक्षाच्या वतीने नवखा उमेदवार दिला आहे याबद्दल नाराजी आहे. एम.के.देशमुख यांना कधी गांधीभवनात बघितले नाही, त्यांना आम्ही ओळखत नाही. त्यांचा प्रचार कसे करणार पक्षाने निष्ठावंत कार्यकर्त्यांला उमेदवारी द्यावी यासाठी कार्यकर्त्यांनी आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी गांधीभवन येथे ठिय्या आंदोलन केले. आमचे हे आंदोलन पक्ष श्रेष्ठींच्या विरोधात नाही तर उमेदवार बदलावा यासाठी आहे अशी माहिती डि-24 न्यूजला युवक काँग्रेसचे पदाधिकारी आमेर अब्दुल सलिम यांनी दिली आहे.
त्यांनी पुढे सांगितले मुस्लिम अल्पसंख्याक उमेदवार देण्याची या मतदारसंघातून मागणी होती त्या अपेक्षा भंग झाल्याने कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला आहे.
यावेळी आमेर अब्दुल सलिम, निलेश आंबेवाडीकर, इंजिनिअर मोहसीन खान, सागर सोळुंके पाटील, मोईनोद्दीन कुरेशी, फैज शेख, फैसल शेख यांची उपस्थिती होती.
What's Your Reaction?