शुक्रवारी या भागातील वीजपुरवठा बंद राहणार आहे, वीज ग्राहकांनी नोंद घ्यावी...!

 0
शुक्रवारी या भागातील वीजपुरवठा बंद राहणार आहे,  वीज ग्राहकांनी नोंद घ्यावी...!

शुक्रवारी या भागातील वीजपुरवठा बंद राहणार आहे...!

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.16(डि-24 न्यूज) - मान्सून पूर्व आणि अत्यावश्यक दुरुस्तीच्या कामासाठी महावितरणने शुक्रवारी, 17 एप्रिल 2026 रोजी काही भागात वीजपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. शहरातील काही भागात ठराविक काळात वीज खंडित राहणार आहे यासाठी वीज ग्राहकांनी सहकार्य करावे असे आवाहन महावितरणने केले आहे.

या भागात राहणार वीज बंद...

भीम टेकडी फिडर आणि दिल्लीगेट फिडरवरील एव्हरेस्ट इंजिनिअरिंग कॉलेज, अंबर हिल, बशीर नगर, केजीएन पार्क, सईदा काॅलनी, चेतना नगर, जहांगीर काॅलनी, हर्सुल गाव, कोलठाणवाडी रोड, फातेमा नगर येथील वीजपुरवठा सकाळी 10 ते दुपारी 4 वाजेपर्यंत बंद राहणार आहे याची नागरिकांनी नोंद घ्यावी.

पडेगाव उप केंद्रावरील सर्व फिडर, निशांत पार्क फिडर, रेल्वे स्टेशन फिडर वरील उद्योग इंद्रकमल, स्काय सिटी, निशांत पार्क परिसर, मास्टर कुक हाॅटेल, दिशा नगरी, झेड गॅलेक्सी, शिवकला नेत्रालय, द्वारकादास नगर, शाहनूरवाडी, समाधान काॅलनी येथील वीजपुरवठा सकाळी 9 ते दुपारी 2 वाजेपर्यंत बंद राहणार आहे.

रेल्वे उपकेद्रावरील फिडर्सवरील सर्व ग्राहकांची वीज सकाळी 9 ते 4 वाजेपर्यंत बंद राहणार आहे.

तसेच म्हाडा कॉलनी, चिकलठाणा गांव, सावित्रिनगर, विमानतळासमोरील भाग, प्रकाश नगर, रामनगर, नारेगाव, एन-11, एन-12, एन-1, पाॅवरलूम, गौतम दाल मील, ग्रीव्हज, सिंधी काॅलनी, खोकडपुरा, बंजारा काॅलनी, उस्मानपुरा, एमबीएच काॅलनी, विकास नगर या भागातील वीजपुरवठा सकाळी 9 ते दुपारी एक वाजेपर्यंत बंद राहणार आहे. महावितरणच्या कामाच्या नियोजनानुसार वीजपुरवठा दिलेल्या वेळेपूर्वी अथवा वेळेनंतर पूर्ववत होऊ शकतो याची वीज ग्राहकांनी नोंद घ्यावी व महावितरणला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow