उद्या औरंगाबाद नामांतर विरोधातील याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी...!

 0
उद्या औरंगाबाद नामांतर विरोधातील याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी...!

उद्या औरंगाबाद नामांतर विरोधी याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी...!

छ.संभाजीनगर(औरंगाबाद) दि.26(डि-24 न्यूज) उद्या दिल्लीत सर्वोच्च न्यायालयात औरंगाबाद नामांतर विरोधात दाखल याचिकेवर सुनावणी होणार आहे. अशी माहिती डि-24 न्यूजला याचिकाकर्ते मोहंमद हिशाम उस्मानी यांनी दिली आहे. त्यांनी विश्वास व्यक्त केला की आम्ही न्यायालयात सिनिअर कौन्सिलच्या मजबूतपणे आपली बाजू मांडण्याची संधी मिळेल. न्यायालयावर आमचा ठाम विश्वास आहे आम्हाला न्याय मिळेल. आम्ही आपल्या लिगल टिमसोबत दिल्लीत दाखल झालो आहे. औरंगाबादचे नाव वाचवण्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढणार असल्याचा मी शहरातील नागरिकांच्या वतीने लढण्याचा संकल्प केला आहे. असे त्यांनी सांगितले. अगोदर नामांतर विरोधातील मुश्ताक अहमद यांची याचिका न्यायालयाने फेटाळली होती. सरकारने औरंगाबाद विभाग, जिल्हा, शहर, तालुका व गावाचे नाव छत्रपती संभाजीनगर करण्याचा निर्णय घेतला होता याविरोधात बाॅम्बे उच्च न्यायालयात याचिका फेटाळण्यात आली होती यानंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. उद्याच्या होणा-या सुनावणीत काय होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow