चौकशी समितीचा अहवाल थातूरमातूर, सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार - इम्तियाज जलील
चौकशी समितीचा अहवाल थातूरमातूर, सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार - इम्तियाज जलील
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.4(डि-24 न्यूज) औरंगाबाद पूर्व विधानसभा मतदारसंघाचे एमआयएमचे उमेदवार इम्तियाज जलील यांनी निवडणुकीत मतदानाच्या दिवशी जो गोंधळ झाला त्याचे व्हिडिओ फुटेज व पुरावे निवडणूक आयोग, जिल्हा प्रशासन, पोलिस आयुक्त, निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली होती.
आज जिल्हा परिषद येथे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा जिल्हा नोडल अधिकारी विकास मिना यांच्याकडे या प्रकरणी सुनावणी झाली. या प्रकरणी चौकशी करण्यासाठी प्रशासनाने अपर जिल्हाधिकारी तथा आचारसंहितेचे सदस्य अरविंद लोखंडे, एसिपि प्रशांत स्वामी, औरंगाबाद पूर्वचे निवडणूक निर्णय अधिकारी चेतन गिरासे यांची नियुक्ती करण्यात आली होती.
आज या समितीने चौकशी अहवाल नोडल अधिकारी यांच्याकडे सादर केला. हा चौकशी अहवाल थातूरमातूर दिला आहे. तक्रारीत सर्व पुरावे दिले तरीही न्यायाची अपेक्षा नसल्याने उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार असल्याची माहिती यावेळी माध्यमांना इम्तियाज जलील यांनी दिली आहे. चौकशी समिती थातूरमातूर अहवाल देत असेल तर यांच्याकडून न्यायाची अपेक्षा कशी करता येईल असा आरोप इम्तियाज जलील यांनी चौकशी समितीवर केला आहे.
What's Your Reaction?