उद्यापासून राज्यात काँग्रेसचे ईव्हिएम विरोधात स्वाक्षरी अभियान

 0
उद्यापासून राज्यात काँग्रेसचे ईव्हिएम विरोधात स्वाक्षरी अभियान

उद्यापासून राज्यात काँग्रेसचे ईव्हिएम विरोधात स्वाक्षरी अभियान

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद),दि.4(डि-24 न्यूज) उद्यापासून महाराष्ट्रात ईव्हिएम विरोधात राज्यस्तरीय स्वाक्षरी अभियान घेण्याचा निर्णय प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी घेतला आहे. रेल्वेस्टेशन येथील मुख्य प्रवेशद्वारापासून या अभियानाला उद्या दुपारी एक वाजता सुरुवात केली जाईल. मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे. काँग्रेसची मागणी आहे यापुढे ज्या निवडणुका होतील त्या बॅलेटपेपरवर घेण्यासाठी हे जन आंदोलन अक्रामकपणे करण्यात येणार आहे. 5 डिसेंबर ते 20 डिसेंबर पर्यंत हे अभियान राबविण्यात येणार आहे. यानंतर राष्ट्रपती, पंतप्रधान व निवडणूक आयोगाला स्वाक्षरी मोहीम अंतर्गत निवेदन देण्यात येणार आहे. बॅलेट पेपर वर निवडणुका घेण्याची मागणी काँग्रेस करणार आहे. केंद्रीय नेतृत्व सुध्दा ईव्हिएम विरोधात देशभर ईव्हिएम विरोधात मोठे आंदोलन उभे करण्याची तयारी करत आहे. विधानसभेचे निकाल बघता जनतेचा विश्वास आता ईव्हिएमवर राहिलेला नाही यामुळे लोकशाही धोक्यात आली आहे अशी माहिती शहागंज येथील गांधी भवन येथे पदाधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर शहर जिल्हा कॉग्रेस कमेटीचे अध्यक्ष युसुफ शेख यांनी दिली आहे.

त्यांनी यावेळी आगामी महापालिका निवडणुकीची तयारी स्वबळावर करण्यासाठी कामाला लागावे व काँग्रेस पक्षाचे विविध सेल, कमिटीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शहरातील सर्व वार्डात स्वाक्षरी मोहीम राबवून यशस्वी करावे असे आवाहन केले आहे.

या बैठकीत महीला शहराध्यक्ष दिपाली मिसाळ, इंटकचे शहराध्यक्ष शेख अथर, माजी नगरसेवक किशोर तुळशीबागवाले, प्रवक्ते मसरुर खान, माजी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष मुजफ्फर खान पठाण, आकेफ रझवी, उमाकांत खोतकर, लियाकत पठाण, सुरेश टाक व पदाधिकारी उपस्थित होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow