काँग्रेस - राष्ट्रवादी शरदचंद्र पवार आघाडीच्या प्रचाराचा नारळ फुटला, प्रभाग क्रं. 10 चे उमेदवार सचिन तांगडे यांच्या प्रचाराला सुरुवात...
काँग्रेस - राष्ट्रवादी आघाडीच्या प्रचाराचा नारळ फुटला, प्रभाग क्रं 10 चे उमेदवार सचिन तांगडे
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.3(डि-24 न्यूज) - छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. आज सकाळी काळा गणपतीचे दर्शन घेऊन जालन्याचे खासदार डॉ. कल्याण काळे यांच्या हस्ते नारळ फोडून काँग्रेस-राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रचाराची सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी प्रभाग क्रमांक 10 (ड) चे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पार्टीचे अधिकृत उमेदवार सचिन मारुती तांगडे यांच्या प्रचाराला सुरुवात झाली.
याप्रसंगी मान्यवरांचे स्वागत जिल्हाध्यक्ष पांडुरंग तांगडे पाटील यांनी केले.
यावेळी शुभेच्छा देण्यासाठी काँग्रेस सेवादलाचे प्रदेशाध्यक्ष विलास औताडे, माजी जिल्हाध्यक्ष सुधाकर सोनवणे, प्राचार्य सलिम शेख, राजेश पवार, अशोक खोसरे, उध्दव बनसोडे, मदन इंगळे, सतीश देशमुख, एड राजेंद्र ठोंबरे, राजेंद्र चव्हाण, आशिष पवार, आशिष इंगळे, सुशील बोर्डे, शैलेंद्र देहाडे, अशोक घारे, प्रशांत जगताप, रविंद्र वीर, उकीर्डे पाटील, हर्षल निकम, योगेश घुगे, केतन श्रीखंडे, अजय गाढे, मारोती तांगडे, शेरुभाई काजी आदी उपस्थित होते.
What's Your Reaction?