महापालिका निवडणुकीसाठी चिन्हांचे वाटप, उमेदवार लागले प्रचाराला...
निशाणी मिळाली, उमेदवार लागले प्रचाराला, निशाणीसाठी काढावा लागला लकी ड्रॉ....
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) -छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणुकीसाठी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करून रिंगणात उतरलेल्या उमेदवारांना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी आज शनिवारी निवडणूक चिन्हांचे वाटप केले. यानंतर सर्व उमेदवारांनी आप आपल्या प्रभागात भेटीगाठी व प्रचाराला सुरुवात केली आहे. उमेदवारांनी मागणी केल्यानुसार जवळपास सर्वच अपक्षांना त्यांच्या आवडीचे चिन्ह मिळाले.
परंतु प्रभाग 16 क आणि ड मधील दोन अपक्षांनी कपबशी चिन्हाची मागणी केली होती. त्यामुळे लकी ड्रॉ काढून निर्णय घेण्यात आला अशी माहिती प्रभाग 15, 16, 17 चे निवडणूक निर्णय अधिकारी निलेश अपार यांनी दिली.
प्रभाग 16 क मधील दोन अपक्ष उमेदवारांनी कपबशी चिन्ह देण्यासाठी मागणी केली. त्यामुळे लकी ड्रॉ काढण्याचा निर्णय घेण्यात आला. चिठ्ठीत नाव निघालेल्या अपक्ष उमेदवाराला कपबशी चिन्ह देण्यात आले, तर दुसऱ्याला शिलाई मशीन चिन्ह दिले., असे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी सांगितले.
झोन 9 : प्रभाग 20 'अ' मध्ये 'गॅस टाकी'साठी ड्रॉ काढण्यात आला...
निवडणूक निर्णय अधिकारी प्रभाग 20 (प्रभाग 18,19,20) मध्येही एकाच चिन्हासाठी दोन अपक्ष उमेदवार अडून बसल्याने, लकी ड्रॉ काढण्यात आला. प्रभाग 20 अ मध्ये वंचित बहुजन आघाडी आणि बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीच्या उमेदवाराने गॅस टाकी हे चिन्ह देण्याची मागणी केली होती. ड्रॉ नंतर बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीच्या उमेदवाराला गॅस टाकी चिन्ह मिळाले, तर 'वंचित'च्या उमेवाराला फुटलेला नारळ चिन्ह मिळाले. आता फुटलेला नारळ 16 जानेवारीला विजय मिळवून देतो का नाही हे समोर येईल.
What's Your Reaction?