आता वक्फ बोर्डाच्या जमीनींचा विविध विकास कामांसाठी उपयोग करता येणार...!
आता वक्फ बोर्डाच्या जमीनींचा विविध विकास कामासाठी उपयोग करता येणार...
अध्यक्ष जमीर काझी यांनी जाहीर केला धोरणात्मक निर्णय...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.3(डि-24 न्यूज) महाराष्ट्र
वक्फ बोर्डाच्या राज्यातील शेकडो एकर जमिनींचा उपयोग आता विविध विकास कामासाठी उपयोग करण्यात यावा या साठी बोर्डाने धोरणात्मक निर्णय घेतला आहे. जमिनींचा उपयोग शैक्षणिक व आरोग्य सेवा देण्या साठी व्हावा हा त्या मागचा हेतू असेल,अशी महत्वपूर्ण माहिती बोर्डाचे अध्यक्ष समीर काझी यांनी दिली.
पुण्याच्या आजम कॅम्पस येथील एमसीईएस या नामवंत संस्थे तर्फे आयोजित "वक्फ संपत्ती आणि उपयोग" या विषयावर एकदिवसीय कार्यशाळा अयोजित करण्यात आली होती, यावेळी ते बोलत होते.
वक्फ बोर्डाचा उद्देश हा मुळात समाजासाठी कल्याणकारी योजना राबवून त्यांचे बळकटीकरण करण्याचा आहे. त्यासाठी मागच्या काही वर्षांत हे काम पूर्णपणे करण्यात आले नाही. मात्र आता जमिनींचा उपयोग योग्य रीतीने केल्यास त्याचा फायदा निश्चितपणे समाजाला होईल,असा विश्वास ही त्यांनी व्यक्त केला. जमिनीचा विकास करण्यासाठी आम्ही वेळोवेळी शैक्षणिक व आरोग्यसेवा राबविणाऱ्या संस्थांना आवाहन करत आहोत अनेक संस्थांनी सकारात्मक प्रस्ताव दाखल केले आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात ही योजना राबविण्याचा आमचा उद्देश आहे. त्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. राज्यभरात जनजागृती करून ही योजना राबविण्यात येणार आहे.
तो निधी फक्त बळकटीकरण साठीच...
महाराष्ट्र शासनाच्या अल्पसंख्याक विभागा कडून नुकतेच वक्फ बोर्डाला दिलेला दहा कोटी निधीचा अध्यादेश रद्द केला. या वर समीर काझी यांनी सांगितले की, वक्फ जनतेच्या सेवे साठी काम करणारी स्वायत्त संस्था आहे. संस्थेस शासना कडून कर्मचाऱ्यांना पगारसाठी पैसा दिला जात नाही, मात्र समाजाची सेवा देण्याची यंत्रणा सक्षमपणे अधिक बळकट व्हावी,या साठी इतर महामंडळांच्या धर्तीवर निधी देण्यात आला होता. महाराष्ट्रात कोणाचीही सत्ता असो,त्यांनी समाजासाठी या कार्यात नेहमी सकारात्मक सहभाग घेतला आहे. या पुढेही शासन सकारत्मक सहकार्य करणारच,अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
नोंदणीचा "मिशन जीरो पेंडंसी"उपक्रम राबविणार
मी बोर्डाचा अध्यक्ष झाल्या पासून गेल्या वर्षभरात अनेक उपक्रमावर काम केले आहे. फक्त 23 कर्मचाऱ्यांच्या खांद्यावर चालणारा राज्याचा कारभार सुधारण्यासाठी साठ नियमित कर्मचाऱ्यांची भरती करण्यात आली आहे. जिल्ह्यांची यंत्रणा सक्षम झाल्या मुळे आता संस्थांच्या नोंदणीसाठी "मिशन जीरो पेंडंसी" संकल्पना राबविण्यात येणार आहे. त्यामुळे राज्यातील सर्व संस्था नोंदणीकृत होणार आहे.
मुख्यकार्यालयात "हेल्प डेस्क"
राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात वक्फ कार्यालय उघडण्यात आले आहे. संबंधित लोकांना मुख्य कार्यालयात चकरा मारण्यात येऊ नये,व कोणतेही प्रस्ताव त्याच जिल्हा कार्यलयात स्वीकारण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. लोकांचा पैसा व वेळ वाचावा, हा त्या मागचा हेतू असून यात आम्ही यशस्वी झालो. तसेच संबंधितांची अडचण दूर करण्यासाठी आम्ही लवकरच मुख्य कार्यलयात "हेल्प डेस्क"ची सुरुवात करणार आहोत. शासनाच्या "एक खिडकी" योजनेच्या धर्तीवर लोकांच्या अडचणीवर मात करण्यासाठी ही संकल्पना ही महत्त्वाची ठरणार आहे. आधुनिक तंत्रज्ञानाची जोड निर्माण करून लोकांना तात्काळ दिलासा देण्यासाठी वक्फ यंत्रणा सक्षम करण्यावर आमचा भर राहणार आहे.
कार्यशाळेच्या समारोप नंतर पुणे विभागातील संस्थांच्या अनेक पदाधिकारी व सदस्यांनी भेट घेत निवेदने दिली व आपल्या अडचणी मांडल्या. या वेळी समीर काझी यांनी सर्वांशी सकारात्मक चर्चा करून त्यांच्या संस्थांच्या अडचणी एकूण घेतल्या व लवकरच दूर करण्यात येईल, असे आश्वासन दिलं.त्यांनी संबंधीत वक्फ अधिकाऱ्यांशी चर्चा अडचणी दूर करण्याचे निर्देश दिले. कार्यशाळेत वक्फच्या विविध विषयावर पाटणा येथील चाणक्य विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.फैजान मुस्तफा, दिल्ली येथील ऑल इंडिया जकात फौंडेशनचे अध्यक्ष डॉ.जफर महमूद, एमसीईएस संस्थेचे अध्यक्ष पी.ए.इनामदार, उपाध्यक्ष आबेदा इनामदार, वक्फ टास्क फोर्सचे अध्यक्ष सलीम मुल्ला व सल्लागार अक्रमुल जब्बार या वक्त्यांनी मार्गदर्शन केले.
What's Your Reaction?