फैसल मुजावर प्रभाग क्रमांक 4 मधून निवडणूक लढण्यास इच्छुक, दोनच दिवसात राष्ट्रवादीच्या 105 इच्छूकांनी घेतले अर्ज...

 0
फैसल मुजावर प्रभाग क्रमांक 4 मधून निवडणूक लढण्यास इच्छुक, दोनच दिवसात राष्ट्रवादीच्या 105 इच्छूकांनी घेतले अर्ज...

फैसल मुजावर प्रभाग 4 मधून इच्छुक, मनपा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीचे 105 इच्छूकांनी घेतले अर्ज...

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.18(डि-24 न्यूज) - नगरपरिषद व नगरपंचायत समीतीनंतर जिल्हा परिषद, पंचायत समिती नंतर महापालिका निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता आहे. यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) महापालिका निवडणुकीसाठी हडको येथील राष्ट्रवादी भवन येथे 17 नोव्हेंबर पासून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने इच्छूक उमेदवारांचे अर्ज मागविण्यात येत आहे. प्रभाग क्रमांक 4 येथून पडेगाव, अन्सार काॅलनी येथील शेख फैसल मुजावर यांनी इच्छुक उमेदवारीचा अर्ज दाखल केला. फैसल मुजावर हे मागिल अनेक वर्षांपासून सामाजिक व राजकीय क्षेत्रात निस्वार्थ भावनेने काम करत आहे. सोबत सर्व जाती धर्मातील लोक आहेत. पक्षाने संधी दिली तर या प्रभागातून विजय निश्चित मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

याप्रसंगी राष्ट्रवादी ओबीसी विभागाचे मराठवाडा अध्यक्ष जितेंद्र अटक, उबाठाचे छत्रपती संभाजीनगर पश्चिम विभाग प्रमुख बाळासाहेब आगडे, शहर जिल्हा बुथ कमेटी अध्यक्ष मोहम्मद हबीब शेख उर्फ मुन्नाभाई, रामदास लोहकरे, विनोद खामगांवकर, अयूब खान, शेख इरफान, सय्यद एजाज, मुकीमोद्दीन सिद्दीकी, बासेत देशमुख, हरिभाऊ कांबळे, विजय केदार, कडुबा शिंदे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

हबीब शेख उर्फ मुन्नाभाई यांनी सांगितले शहराध्यक्ष ख्वाजा शरफोद्दीन यांच्या नेतृत्वाखाली महापालिका निवडणुकीत इच्छुक उमेदवारांचे अर्ज पक्षाचे कार्यालय राष्ट्रवादी भवन येथे 17 ते 22 नोव्हेंबर पर्यंत मागवण्यात येत आहे. इच्छूकांचे अर्ज प्रदेश कार्यालयात पाठवले जातील. महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडीचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील. उमेदवारी देण्याचा अधिकार पक्ष घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow