पडेगाव, अन्सार काॅलनीत राष्ट्रवादीच्या वतीने मतदार नोंदणी कॅम्पचे आयोजन
पडेगाव,
अन्सार काॅलनीत राष्ट्रवादीच्या वतीने मतदार नोंदणी कॅम्पचे आयोजन
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.4(डि-24 न्यूज) राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टीच्या वतीने विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. पडेगाव वार्डातील अन्सार काॅलनीत राष्ट्रवादी ओबीसी विभागाचे संघटक सचिव शेख फैसल मुजावर यांनी पुढाकार घेत नवीन मतदार नोंदणी कॅम्पचे आयोजन केले होते. सकाळी दहा वाजता कॅम्पचे उद्घाटन जिल्हाध्यक्ष पांडुरंग तांगडे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. सायंकाळी पाच वाजेपर्यंत शेकडो मतदारांनी नवीन मतदार नोंदणी, स्थलांतर व नाव व पत्ता सुधारणा फाॅर्म भरुन कॅम्पचा लाभ घेतला.
याप्रसंगी आशिष पवार, डॉ.गणेश, रामदास लोकरे, शेख निजाम, शेख कदीर, शेख युसूफ, सोहेल खान, अजहर खान, शेख फहाद मुजावर, अहेमद पटेल, शेख गुलाम कादीर, हाफीज रिहान, हाफिज हबीब अलवी, शेख अमान, शेख फरहान मुजावर यांनी कॅम्प यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.
What's Your Reaction?