एमआयएमच्या स्विकृत सदस्यपदी कुणाल खरात, मोहम्मद असरार, शेख अहेमद, शारेक नक्शबंदी यांचा पत्ता कट...
एमआयएमच्या स्विकृत सदस्यपदी कुणाल खरात, मोहम्मद असरार, शेख अहेमद, शारेक नक्शबंदी यांचा पत्ता कट.... कार्यकर्त्यांचे नजरा लागले होते कोणाला मिळेल स्विकृत सदस्यपद ती प्रतिक्षा आज संपली...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.29(डि-24 न्यूज) - एमआयएम (ऑल इंडिया मजलिस -ए-इत्तेहादूल मूस्लिमिन) पक्षाच्या स्विकृत सदस्यपदी विद्यार्थी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष कुणाल खरात, प्रभाग क्रमांक 12 मधून ज्यांची महापालिका निवडणुकीत उमेदवारी रद्द झाली होती असे युवक शहर अध्यक्ष मोहम्मद असरार, माजी जिल्हाध्यक्ष शेख अहेमद यांची 2026-27 साठी पक्षाचे सुप्रीमो खासदार असदोद्दीन ओवेसी यांच्या आदेशाने प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलिल यांनी घोषणा केली आहे. एमआयएमचे 33 नगरसेवक निवडून आले आहे. विरोधीपक्षनेते पदही मिळाले आहे. 11 सदस्यांवर एक स्विकृत सदस्य असे तीन सदस्य पक्षाकडून नियुक्त करता येतात. 31 मार्चच्या अगोदर नामांकन दाखल करण्यासाठी वेळ आहे. आज एमआयएम ने आपल्या पक्षाच्या स्विकृत सदस्यांची नावे जाहीर केली आहे. माजी शहराध्यक्ष शारेक नक्शबंदी यांचे नाव सर्वात जास्त चर्चेत होते परंतु त्यांचा पत्ता कट झाला आहे. आता पक्षाच्या वतीने त्यांना कोणती जवाबदारी दिली जाते हे बघावे लागेल. नाराज असलेल्या जुन्या फळीतील शेख अहेमद यांना स्विकृत सदस्यपदी निवड करुन राजकीय पुनर्वसन केले असल्याची चर्चा आहे.
या सदस्यांनी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी योगदान द्यावे, नागरीकांच्या तक्रारींचे निवारण करावे तसेच सामाजिक व जनहितार्थ उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवावा अशी अपेक्षा पक्षाच्या वतीने व्यक्त केली आहे. नवनियुक्त स्विकृत सदस्यांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अभिनंदन केले आहे.
What's Your Reaction?