नितीन पाटील यांचा राष्ट्रवादीत प्रवेश, कन्नडमधून इच्छुक

 0
नितीन पाटील यांचा राष्ट्रवादीत प्रवेश, कन्नडमधून इच्छुक

नितीन पाटील यांचा राष्ट्रवादीत प्रवेश, कन्नडमधून इच्छुक

छ.संभाजीनगर(औरंगाबाद) दि.29(डि-24 न्यूज) कन्नडचे माजी आमदार नितीन पाटील यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह आज मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादीत प्रवेश केला. ते आगामी विधानसभा निवडणुकीत कन्नड विधानसभा मतदारसंघातून इच्छुक आहेत. नितीन पाटील हे अगोदर काँग्रेसमध्ये होते. औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन, कन्नड साखर कारखान्याचे चेअरमन पदावर त्यांनी काम केले. पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्याशी त्यांची जवळीक आहे. महायुतीचे उमेदवार म्हणून या मतदारसंघातून संधी मिळावी यासाठी त्यांनी या पक्षात प्रवेश केला अशी चर्चा मतदारसंघात आहे. कन्नड येथून उध्दव ठाकरे शिवसेनेचे उदयसिंह राजपूत हे आमदार आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीत नितीन पाटील यांना उमेदवारी मिळाली तर राष्ट्रवादी व उध्दवसेनेत मुकाबला होईल असे बोलले जात आहे. माजी आमदार हर्षवर्धन जाधव, काँग्रेसचे माजी आमदार नामदेव पवार, माजी नगराध्यक्ष संतोष कोल्हे हे सुद्धा या मतदारसंघातून निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत त्यांनीही तयारी सुरू केली आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow