अशोक चव्हाण यांचा काँग्रेस सदस्यपदाचा राजीनाम्याने खळबळ, अमित शहा यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करणार...?
राज्यसभा निवडणूकी अगोदर काँग्रेसला मोठा धक्का, अशोक चव्हाण यांचा राजीनामा...
मुंबई, दि.12(डि-24 न्यूज) माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेस सदस्यपदाचा राजीनामा दिल्याने खळबळ उडाली आहे. राज्यसभेच्या निवडणुकी अगोदर काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. अशोक चव्हाण हे आपल्या समर्थकांसह भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. सात ते आठ काँग्रेसचे आमदार चव्हाण यांच्यासोबत जाणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया आली आहे. हा मोठा राजकीय भुकंप मानला जात आहे. चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे दिल्लीत दाखल झाले असल्याचे कळत आहे.
चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर नांदेडचे राजकारणात बदलणार काँग्रेसच्या या गडाला धक्का बसला आहे.
चव्हाण यांनी आज 12 फेब्रुवारी रोजी नाना पटोले यांना दोन ओळींचे राजीनामा पत्र पाठवले आहे. त्यांनी या राजीनाम्यात म्हटले आहे की मी इंडियन नॅशनल काँग्रेस पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा याद्वारे सादर करत आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत म्हणाले आगे आगे देखो क्या होता है. काँग्रेसचे अनेक नेते भाजपाच्या संपर्कात आहे. ज्याप्रकारे काँग्रेस पक्ष देशात वाटचाल करत आहे त्यातून जनतेशी जोडलेले नेत्यांची घुसमट होत आहे. देशभरातील काँग्रेसचे लोकनेते भाजपात प्रवेश करत आहे. त्यामुळे असे म्हणत आहे आगे आगे देखो क्या होता है. अशी प्रतिक्रिया फडणवीस यांनी दिली आहे. अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्याने मराठवाड्यातील काँग्रेसचे मोठे नुकसान होईल अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. 15 फेब्रुवारी रोजी औरंगाबाद शहरात होणाऱ्या गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत आपल्या समर्थकांसह भाजपात प्रवेश करणार असल्याची माहिती मिळत आहे.
What's Your Reaction?