VIP ची सुरक्षा, गंभीर गुन्ह्यांचा तपासात छडा लावणा-या पोलिस दलातील श्वान गौरीचे निधन

 0
VIP ची सुरक्षा, गंभीर गुन्ह्यांचा तपासात छडा लावणा-या पोलिस दलातील श्वान गौरीचे निधन

VIP व्यक्तींच्या सुरक्षेत असणा-या, गुन्ह्यांचे तपासातकामी छडा लावणा-या श्वान गौरीला अखेरचा निरोप...

पोलिस श्वान गौरीचा टयुमरमुळे मृत्युने दु:खाचे सावट, जवानाप्रमाणे दिली मानवंदना

औरंगाबाद,दि.11(डि-24 न्यूज) अनेक VIP ची सुरक्षा करणे अनेक गुन्ह्यांचा छडा लावण्यासाठी लॅब्रेडॉर जातीच्या गौरी श्वानाचा रविवारी दु:खद मृत्यू झाला. गौरीच्या निवृत्तीच्या प्रकरणाची चौकशीही करण्यात आली होती. त्याचा अहवाल पोलिस आयुक्तांना सादरही केला आहे. काही महिन्यांपूर्वी पोटात व मानेत तिला ट्यूमर झाला होता. त्यातच तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. पोलिसांनी तिला एखाद्या जवानाप्रमाणे अखेरची मानवंदना दिली. त्यावेळी पोलिस कर्मचारी भावूक झाले होते.

गौरीचे वय 9 वर्षे 8 महिने एवढे होते. मागील काही महिन्यापूर्वी पोटात व मानेला ट्युमर असल्याने उपचार सुरू होते.

बॉम्ब शोधक व नाशक पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी मानवंदना देवून अंत्यसंस्कार पुर्ण करण्यात आले. गौरीचे 2014 साली 6 महिने श्वान प्रशिक्षण केंद्र पुणे या ठिकाणी "स्फोटके शोधण्याचे प्रशिक्षण देण्यात आले होते. प्रशिक्षण झाल्यानंतर 2015 पासून ती बॉम्ब शोधक पथकात कार्यरत होती. श्वान "गौरी" ने कर्तव्यकाळात बॉम्ब शोधक व नाशक पथकासोबत बॉम्ब कॉल, थेट कॉल, संशयित वस्तु यांची तपासणी करणे, महत्वाचे स्थळाची घातपात विरोधी तपासणी करणे, महत्वाची स्थळांची तपासणी करणे इत्यादीमध्ये यशस्वीरित्या सहभाग घेतलेला आहे.

गौरीचा जन्म 5 मे 2014 ला जन्म झाला होता. गौरीला ज्यावेळेस विकत घेतले होते त्यानंतर तिला शहरात आणण्यात आले. ज्या दिवशी ती आली, त्या दिवशी गौरी गणपतीच्या स्थापनेचा दिवस होता. त्यामुळे तिचा सांभाळ करण्याची जबाबदारी असलेले साफौ.नवनाथ वाळके व पो.हे. अशोक थोरात यांनी तिचे नाव गौरी ठेवले.

बीडीडीएस पथकाच्या अंतर्गत वादातुन दहा वर्ष होण्याआगोदरच वैद्यकीय अहवालावरून गौरीला निवृत्त करण्याचा प्रयत्न केला गेला. याप्रकरणी पोलिस आयुक्तांनी या प्रकाराची चौकशी करण्याचे आदेश सहाय्यक पोलिस आयुक्त प्रशासन यांनी चौकशी करून अहवाल पोलिस आयुक्तांना पाठविल्याचे पोलिस दलातील वरीष्ठ सुत्रांनी हि माहिती दिली.

गौरीने पोलिस दलात तपासकामी अनमोल योगदानामुळे नेहमी आठवणीत राहणार...

श्वान गौरीने दाभोळकर हत्याप्रकरणातील आरोपींची शस्त्रे पकडण्यास पोलिसांना मदत केली होती.

रेल्वे स्थानकावर डेटोनेटर आढळून आले होते. त्याचाही छडा गौरीने लावला होता.

विमानतळावर आढळलेली अज्ञात बॅगचाही शोध श्वान गौरीने लावला होता. म्हणून नेहमी आठवणीत राहणार आहे अशी प्रतिक्रिया यावेळी व्यक्त करण्यात आली.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow