नागरीकांचा मॅरेथॉन स्पर्धेला प्रचंड प्रतिसाद, विजेत्यांना मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते मेडल
नागरिकांचा मॅरेथॉनला प्रचंड प्रतिसाद
1500 जणांना वाटले मेडल
गृहनिर्माण आणि इतर मागास बहुजन कल्याण मंत्री श्री अतुल सावे यांची उपस्थिती...
औरंगाबाद, दि.11(डि-24 न्यूज) पूर्व मतदार संघाचे आमदार तथा राज्याचे गृहनिर्माण आणि इतर मागास बहुजन कल्याण मंत्री श्री अतुल सावे यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये मॅरेथॉन स्पर्धा मोठ्या उत्साहात रविवारी पार पडली. या स्पर्धेत हजारो नागरिकांनी युवकांनी महिलांनी विविध गाण्यांवर ठेका धरत सहभाग नोंदवला होता.
शहरात मागील अनेक दिवसांपासून नमो चषक स्पर्धा आयोजित करण्यात आली. यातील शेवटची आऊट डोअर स्पर्धा असलेल्या मॅरेथॉन स्पर्धेत शहरातील हजारो खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता.
पूर्व मतदार संघातील एन 8 येथील बाळासाहेब ठाकरे येथील उद्याना पासून ही स्पर्धा सुरू करण्यात आली होती. याला राज्याचे गृहनिर्माण आणि इतर मागास बहुजन कल्याण मंत्री श्री अतुल सावे यांनी झेंडा दाखवून सकाळी 6 वाजता सुरुवात झाली.
ही स्पर्धा एन 8 येथील बाळासाहेब ठाकरे उद्यान येथून सुरू झाली आणि बजरंग चौक, हिंदुराष्ट्र चौक, एसबी आय ट्रेनिंग सेंटर, सर्व्हिस रोड, कॅनॉट परीसर, हॉटेल आंबेडकर, शिवा पीक अप, चिश्टिया चौक, आविष्कार चौक, एन 6 मार्गे बाळासाहेब ठाकरे उद्यान येथे समारोप करण्यात आला.
शहरातील खेळाडूंनी अत्यंत उत्साह पूर्ण वातावरणात या स्पर्धेत सहभाग घेऊन 5 किलो मीटर चे अंतर धावत पार केले. यातून महिला आणि पुरुष गटातून प्रत्येकी तीन विजेते जाहीर करण्यात आले. यात अंगद कान्हेरे,आकाश जाधव, रवींद्र जाधव, अमृता गायकवाड, जयश्री नरवडे, सरला कदम यांनी प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकावला तसेच ज्यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला अशा 1500 धावपटूं ना मेडल चे वाटप मंत्री श्री अतुल सावे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी युवा उद्योजक अजिंक्य सावे, शिवाजी दांडगे, गणेश नावंदर, विवेक राठोड, नितीन खरात, बालाजी मुंडे, अमेय देशमुख, राजेश मिरकर राहुल खरात, एसीपी संपत शिंदे, पोलीस निरीक्षक संदीप गुरमे यांच्या सह भाजप पदाधिकारी तसेच नागरिकांची खेळाडूंची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
आयर्न मेन ओळख असलेले पोलीस निरीक्षक संदीप गुरमे यांनी उपस्थित राहून आलेल्या खेळाडूं
चा उत्साह वाढवला.
What's Your Reaction?