उद्या रंगणार छावणी श्री गणेश महासंघाच्या वतीने भव्य कुस्त्यांची दंगल...

उद्या रंगणार छावणी श्री गणेश महासंघाची भव्य कुस्त्यांची दंगल...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) दि.3(डि-24 न्यूज) छावणी श्री गणेश महासंघ उत्सव समितीच्या वतीने महाराष्ट्राच्या मातीतील अस्सल मैदानी कुस्त्यांची भव्य दंगल स्पर्धा आज गुरुवारी (दि. 4) दुपारी 4 वाजता जाधव मंडप समोरील बास्केट बॉल मैदानावर होणार आहे. सण उत्सवाची परंपरा, संस्कृती जोपसणाऱ्या भव्य कुस्त्यांच्या दंगलीचे यावर्षीचे विशेष आकर्षण म्हणजे शहरातील विविध मल्लांची या कुस्ती स्पर्धेसाठी विशेष उपस्थिती राहणार असल्याची माहिती उत्सव समितीचे अध्यक्ष अनिकेत विशाल दाभाडे यांनी दिली. या भव्य कुस्ती स्पर्धेसाठी डश्री गणेश भक्तांनी उपस्थित राहावे असे आवाहन मुख्य मार्गदर्शक माजी महापौर अशोक सायन्ना, कार्याध्यक्ष रखमाजी जाधव, महासचिव राहुल यल्दी, विनोद साबळे यांच्यासह छावणी श्री गणेश महासंघ उत्सव समितीचे अध्यक्ष विशाल दाभाडे यांनी केले आहे.
What's Your Reaction?






