कराटे चॅम्पियनशिपमध्ये अयान देशमुखचे शानदार प्रदर्शन, पटकावला सिल्व्हर मेडल
कराटे चॅम्पियनशिपमध्ये अयान देशमुखचे शानदार प्रदर्शन
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.2(डि-24 न्यूज) मौलाना आझाद महाविद्यालयात 17 वे ग्रँड स्टेट लेवल कराटे चॅम्पियन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), हिंगोली, परभणी, नांदेड, जालना व कन्नड आणि विविध जिल्ह्यांतून कराटेच्या खेळाडूंनी सहभाग घेतला. शहरातील फियरलेस फायटर स्कूल ऑफ मार्शल आर्ट्सच्या 61 खेळाडूंनी सहभाग घेतला त्यामधून 44 सुवर्णपदक, 10 रजत व 7 ब्राऊंझ पदक पटकावले. पहेला बेस टिम पुरस्कार फियरलेस फायटरला मिळाला. फियरलेस फायटर स्कूल ऑफ मार्शल आर्टस टाईम्स काॅलनी येथे आहे. मुख्य कोच मास्टर मुसाब, असलम शेख यांनी तीन महीन्यापासून खेळाडूंना तयार करण्यासाठी मेहनत घेतली. कठोर परिश्रमानंतर खेळाडू स्पर्धेत उतरले. औरंगाबादला पहेला राज्यस्तरीय चैम्पियनशिप पुरस्कार मिळवून दिला. या स्पर्धेत अयान शाकेर देशमुख याने शानदार प्रदर्शन करत सिल्व्हर मेडल पटकाविला. याबद्दल कोच मास्टर मुसाब, आजी आजोबा, आई वडील, इकरा उर्दू शाळेचे शिक्षक, नातेवाईक यांनी अयानचे अभिनंदन केले आहे
.
What's Your Reaction?