मनपाच्या शाळेत जर्मनी भाषेचा श्रीगणेशा

मनपा प्रियदर्शनी विद्यालयात 'गुटन मॉर्गन, फोयेस नोएस या..' म्हणत नवीन वर्षात जर्मनी भाषेचा श्रीगणेशा'
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.2(डि-24 न्यूज)
गुटन मॉर्गन म्हणजे शुभ सकाळ फोयेस नोस या म्हणजे नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देत महानगरपालिकेच्या प्रियदर्शनी शाळेने नवीन वर्षामध्ये आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत व उपायुक्त तथा शिक्षण विभाग प्रमुख अंकुश पांढरे यांच्या
मार्गदर्शनाखाली जर्मनी भाषा शिकण्याचा उपक्रम सुरू केलेला आहे.
या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमधील भाषिक कौशल्य विकसित करण्याचा शाळेचा प्रयत्न आहे. तसेच जागतिक पातळीवर उच्च माध्यमिक शिक्षणाच्या व्यावसायिकीकरणाच्या दृष्टीने विद्यार्थ्यांना तयार करणे हे या उपक्रमाचे मुख्य उद्दिष्ट आहे, असे मुख्याध्यापक संजीव सोनार यांनी सांगितले.
नवीन शैक्षणिक धोरणानुसार व विद्यार्थ्यांमध्ये कौशल्य विकास व्हावा. तसेच शासनाचा जर्मनीची झालेल्या करारानुसार तिथे कौशल्यपर्ण मनुष्यबळ पुरवण्यासाठी विद्यार्थ्यांना आतापासूनच जर्मनी भाषेचे ज्ञान दिले जात आहे. हा एक पायलेट प्रोजेक्ट असून सर्वच विद्यार्थ्यांचा यात समावेश करण्यात आलेला आहे.
यासाठी शिक्षकांना जर्मनी येथून केदार जाधव म्युनिक, मार्गदर्शन करत आहेत. केदार जाधव हे व्यवसायाने सेमीकंडक्टर इंजिनियर आहेत. जर्मन भाषा विशेषतः मराठीतून शिकवणे, हे त्यांचे पॅशन आहे.
त्यामुळेच त्यांनी आजपर्यंत एक लाख पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना जर्मन भाषा मोफत शिकवली आहे. केदार जाधव हे जर्मन भाषा सोपी करून शिकवतात.
प्रियदर्शनी विद्यालयात आठवड्यात दोन तास विद्यार्थी जर्मन भाषा शिकणार आहेत. यासाठी तेजस्विनी देसले व स्वाती डिडोरे ह्या शिक्षिका विद्यार्थ्यांकडून तयारी करून घेत आहेत.
शासनाचा जर्मनीशी झालेल्या करारानुसार कौशल्यपूर्ण मनुष्यबळ व्हावे यासाठी मनपा प्रियदर्शनी शाळेने इयत्ता पहिले दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यास सुरुवात केलेली आहे आणि विद्यार्थ्यांना सुद्धा जर्मन भाषा शिकण्याबद्दलची ओढ दिसून येते.
मुख्याध्यापक संजीव सोनार यांच्या पुढाकाराने व शिक्षिका तेजस्विनी देसले व स्वाती डिडोरे यांच्या प्रयत्नातून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमामध्ये शाळेचे सर्व शिक्षक सहभागी झाले आहेत.
What's Your Reaction?






