सिडको एन-12 येथे नेत्र रुग्णालयाचे उद्घाटन

सिडको एन-12 येथे नेत्र रुग्णालयाचे उद्घाटन
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.14(डि-24 न्यूज) -
सध्या मोबाईल, संगणक वापर अधिक वाढत असल्याने डोळ्यांचे आजार वाढत असल्याने निदान व उपचार करण्याची आवश्यकता आहे. लहान मुलांना शालेय जीवनात विटामिनची कमतरता असल्याने चष्म्याचे प्रमाण वाढत असल्याने नेत्र रुग्णांची संख्या जशी वाढत आहे तसेच नेत्र तज्ज्ञ व रुग्णालय वाढत आहे. सिडको एन-12 येथे नेत्रतज्ज्ञ डाॅ.अमरीन देशमुख यांच्या नवीन ओपीडिचे उद्घाटन माजी खासदार इम्तियाज जलिल यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
याप्रसंगी बदनापूर येथील मेडिकल काॅलेजचे डिन अजहर अहमद सिद्दीकी, डाॅ.शोएब हाश्मी, नासेर सिद्दीकी, जिल्हा परिषद सेवानिवृत्त मुख्य कार्यकारी अधिकारी अं. मुकीम देशमुख, डाॅ.फैसल सय्यद, डाॅ.निसार अहमद देशमुख, चाँद पटेल, डाॅ.हाफिज देशमुख, डाॅ.राज मोहंमद यांची उपस्थिती होती. याप्रसंगी सर्वांनी डाॅ.अमरीन देशमुख यांना शुभेच्छा दिल्या.
What's Your Reaction?






