प्राणि संग्रहालयात आणखी तीन पांढ-या वाघिणीचे आगमन

 0
प्राणि संग्रहालयात आणखी तीन पांढ-या वाघिणीचे आगमन

मनपा प्राणिसंग्रहालयात आणखी 3 पांढऱ्या वाघांचे आगमन

औरंगाबाद, दि.7(डि-24 न्यूज) मनपा प्राणीसंग्रहालयातील पांढरे वाघीन अर्पीता हिने आज रोजी सकाळी 7.30 ते दुपारी 2 वाजेपर्यंत तीन पांढरे बछड्यास जन्म दिलेला आहे.

अर्पीता वाघीण व बछड्याची तपासणी प्राणीसंग्रहालय पशुवैद्यक यांचे मार्फत करण्यात आलेली आहे. दोघांची तब्येत सुदृढ आहे. बछडे आईचे दुध पितांना दिसुन आलेले आहेत. वाघीण स्वतः बछड्याची निगा व काळजी घेत आहे. तसेच केअर टेकर मार्फत सुध्दा बच्छड्याची देखभाल करण्यात येत आहे. तसेच वाघीणीच्या व बच्छड्याच्या 24 तास देखभालीसाठी कर्मचारी नियुक्त करण्यात आलेले आहेत. वीर व अर्पीता या वाघाच्या जोडीमुळे बछड्याचा जन्म झालेला आहे.आज जन्मलेल्या 3 बछड्या मुळे आता एकूण 6 पांढरे वाघ झाले आहेत.

अशी माहिती मुख्य उद्यान अधिकारी विजय पाटील यांनी दिली आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow