खुलताबाद उर्स... जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षक यांनी भेट देऊन केली पाहणी....

खुलताबाद उर्स... जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षक यांनी भेट देऊन पाहणी
उर्स व ईद मिलादून्नबीच्या निमित्ताने असणार विशेष पोलीस बंदोबस्त...
खुलताबाद, दि.7(डि-24 न्यूज) 21 सप्टेंबर पासून खुलताबाद येथील प्रसिद्ध दर्गाह हजरत शेख मुनतजिबोद्दीन जर जरी बक्षचा 737 वा उर्स सुरू होणार आहे. देशभरातून या उर्सनिमित्ताने लाखो भाविक येतात. यानिमित्ताने जिल्हा प्रशासन व उर्स कमेटीच्या वतीने तयारी सुरू आहे. भाविकांना त्रास होऊ नये यासाठी जिल्हाधिकारी अस्तिककुमार पाण्डेय व पोलीस अधीक्षक मनिष कालवनिया यांनी दर्गाह व परिसरात भेट देऊन सुविधांचा आढावा घेतला. मैदान, रस्ते दुरुस्ती, सीसीटीव्ही कॅमेरे, पाण्याची व्यवस्था, पोलिस बंदोबस्त व अन्य उपाययोजना करण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी आढावा घेत प्रशासनाला समस्या लवकर सोडवण्याचे आदेश दिले.
दर्गाह कमेटीने सुचवलेले सूचना सोडविण्याचे आदेश उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, मुख्याधिकारी यांना देण्यात आले. दर्गाह मध्ये परंपरागत स्वागत दर्गाह कमेटीचे अध्यक्ष एजाज अहमद, उपाध्यक्ष इम्रान जहागिरदार, सचिव मतिन जहागिरदार, माजी नगराध्यक्ष एड कैसरोद्दीन यांनी फेटा बांधून व पुष्पगुच्छ देऊन केले. याप्रसंगी उपजिल्हाधिकारी संतोष गरड, अपर पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार, तहसीलदार स्वरुप कन्काळ, मुख्याधिकारी विक्रम दराडे, गटविकास अधिकारी प्रशांत नाईक, पोलीस निरीक्षक भूजंग हातमोडे, सपोनि अमोल ढाकणे, दर्गाह कमेटीचे सालेह मोहंमद, नईम बक्ष, मुबशिरोद्दीन, कमरोद्दीन, हबीब टेलर, शरफोद्दीन, मो.रमजानी, निसार अहमद, तकीयोद्दीन, शब्बीर अहमद, गुफरान अहेमद, रफीयोद्दीन आदी उपस्थित होते.
What's Your Reaction?






