काही रेल्वे एक्स्प्रेस गाड्या तात्पूरत्या रद्द

 0
काही रेल्वे एक्स्प्रेस गाड्या तात्पूरत्या रद्द

काही एक्स्प्रेस गाड्या तात्पुरत्या रद्द  

नांदेड,दि. 29(डि-24 न्यूज) मध्य रेल्वेने कळविल्यानुसार दौंड-मनमाड विभागातील विसापूर ते बिल्वंदी विभागातील दुहेरीकरण च्या कार्या करिता इंटर लॉक आणि नॉन-इंटर लॉक वर्किंग करिता लाईन ब्लॉक घेण्यात आला आहे. त्यामुळे मध्य रेल्वे मधील काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत, त्यापैकी नांदेड विभागातून धावणाऱ्या काही रेल्वे रेक उपलब्ध नसल्यामुळे रद्द करण्यात आल्याचे मध्य रेल्वे ने कळविले आहे. ते पुढील प्रमाणे –

 

या गाड्या रद्द करण्यात आलेल्या आहेत ...

गाडी संख्या 11409 दौंड निझामाबाद एक्स्प्रेस दिनांक 30 आणि 31 ऑक्टोंबर, 02 आणि 03 नोव्हेंबर 2023 या तारखेस रद्द करण्यात आली आहे. 

गाडी संख्या 11410 निझामाबाद - दौंड एक्स्प्रेस दिनांक 01, 02, 04 आणि 05 नोव्हेंबर 2023 या तारखेस रद्द करण्यात आली आहे. 

गाडी संख्या 01413 निझामाबाद ते पंढरपूर एक्स्प्रेस दिनांक 31 ऑक्टोंबर, 01, 03 आणि 04 नोव्हेंबर 2023 या तारखेस रद्द करण्यात आली आहे. 

गाडी संख्या 01414 पंढरपूर ते ते निझामाबाद एक्स्प्रेस दिनांक 01, 02, 04 आणि 05 नोव्हेंबर 2023 या तारखेस रद्द करण्यात आली आहे.

प्रवाशांनी याची नोंद घ्यावी हि विनंती. अशी माहिती डि-24 न्यूजला जनसंपर्क कार्यालय, नांदेड यांनी दिली.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow