टँकर चालकांचा संप मागे, उद्यापासून पेट्रोल पंपावर इंधन पुरवठा होणार...?
टँकर चालकांचा संप मागे, उद्यापासून पेट्रोल पंपावर इंधन पुरवठा होणार
नवी दिल्ली, दि.2(डि-24 न्यूज) केंद्र शासनाने हिट एण्ड रन कायद्यात बदल केल्याने ट्रक चालकांनी 1 जानेवारीपासून संप पुकारला होता. या संपामुळे देशभरात इंधन पुरवठा करण्यात अडचणी येत असल्याने नागरिकांचे दोन दिवसांपासून हाल होत आहे. पेट्रोल पंपावर पेट्रोल डिझेल संपले असल्याने अनेक पेट्रोलपंप ड्राय झाल्याने वाहनधारकांना त्रास होत होता. याबाबत केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला यांच्यासमवेत गृह मंत्रालयात राष्ट्रीय परिवहन संघटनेची बैठक झाली. नवीन मोटार वाहन कायद्याची तुर्तास अंमलबजावणी नाही. केंद्र सरकारने वाहतूकदार संघटनेला आश्वासन दिल्याने मालवाहतूकदारांनी संप मागे घेतला आहे.
यामुळे आता पेट्रोलपंपावर इंधन पुरवठा पूर्ववत होणार असल्याने वाहनधारकांना दिलासा मिळणार आहे.
केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे हिट एण्ड रन कायदा लागू झालेला नाही. ट्रान्सपोर्ट संघटनांनी चालकांना कामावर येण्याचे आवाहन केले आहे. मागील दोन दिवसांपासून राज्यात सुरु असलेल्या संपावर तोडगा निघाल्याने नागरीकांना दिलासा मिळणार आहे.
गृह सचिवांसोबत ऑल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट काँग्रेसच्या शिष्टमंडळाने चर्चा केली. या चर्चेत नवीन मोटार कायद्यातील शिक्षा व दंडाच्या नव्या तरतुदी लागू होणार नसल्याचे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे.
मालवाहतूकदार व टँकर चालकांचा संप मागे घेतल्याने बुधवारपासून इंधन पुरवठा होणार असा अंदाज आहे. या संपामुळे इंधन, भाजीपाला व अत्यावश्यक वस्तूंचा पुरवठा थांबल्याने जनजीवनावर परिणाम होत होता. पेट्रोल पंपावर उद्यापासून रांगा लागणार नाही अशी शक्यता आहे.
What's Your Reaction?