अब्दीमंडी विवादित जमीन व्यवहार कायदेशीर नाही...? जिल्हाधिकारी यांच्या आदेशाला न्यायालयात आव्हान, या जमीनीची खरेदी विक्री करु नका...! वारसदारांचे वकील एम.ए.मदनी,
अब्दीमंडी विवादित जमीन व्यवहार कायदेशीर नाही...? जिल्हाधिकारी यांच्या आदेशाला न्यायालयात आव्हान, या जमीनीची खरेदी विक्री करु नका...!
वारसदारांचे वकील एम.ए.मदनी, अॅड एक.ए.सय्यद यांचा पत्रकार परिषदेत खुलासा
औरंगाबाद, दि.7(डि-24 न्यूज) अब्दीमंडी विवादित जमीन गट क्रं.11,12,26,37, 42 मध्ये 459 एकरपर्यंत जमीन आहे. मागिल वर्षी या जमिनीवर शत्रू संपत्ती असल्याचा ठळक बोर्ड अप्पर तहसीलदार यांनी लावला. 17/10/2023 रोजी जिल्हाधिकारी यांनी आदेश काढले त्यानंतर जलदगतीने या जमीनीचा व्यवहार मुद्रांक व नोंदणी विभागात करण्यात आला.
हि मालमत्ता शत्रु संपत्ती आहे की ईव्ह्याक्यू असा संभ्रम असताना जमिनीचे खरेदी व्यवहार करुन फेरफार हि लवकर आटपण्यात आहे. महसूल विभागात वर्षांवर्षे फेरफार करून देण्यासाठी चकरा माराव्या लागतात मग या प्रकरणात जलदगतीने फेरफार का करण्यात आले. जिल्हाधिकारी यांनी काढलेले आदेशाला आमचा विरोध आहे म्हणून न्यायालयात व विभागीय आयुक्त आणि मंत्रालयात या जमिनीच्या वारसदारांकडून अपिल दाखल केले. या जमीनीची झालेली खरीदी विक्री कायदेशीर नाही. मनू अग्रवाल, तन्वी अग्रवाल, मुंबई व शहरातील संजय चव्हाण यांनी हि जमीन खरेदी केली. हा वाद न्यायालयात असताना खरेदी विक्री करण्यात आली म्हणून कोणीही या जमीनीची खरेदी विक्री करु नये आपली आर्थिक फसवणूक होऊ शकते. जे कोणी व्यवहार करतील ते त्यास जवाबदार राहिल. झालेल्या व्यवहार प्रकरणाची चौकशीचे आदेश राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले आहे. अशी माहिती पत्रकार परिषदेत वारसदारांचे वकील एड एस एस मदनी, एड एम.ए.सय्यद यांनी दिली आहे. या पत्रकार परिषदेला जिपिए होल्डर नाजिया खान मेराज खान, नंदा गायकवाड व इतर उपस्थित होते.
त्यांनी पुढे सांगितले अर्ज क्रं.774/2016 जिल्हाधिकारी यांच्या न्यायालयात प्रलंबित होता.
सदरचा अर्ज गट क्रं.11,12,26,37,42 मौजे अब्दीमंडी मधील या ईव्ह्याक्यू प्राॅपर्टी नव्हती. सदरचा अर्ज दि.17/10/2023 रोजी निकाली काढण्यात आला.
सदरचा अर्ज निकाल मयत महंमद मयोद्दीन पिता महंमद रशियोद्दीन यांच्या हक्कात लागला. सदरील निकालास कोर्टात आव्हानांची तरतूद असताना दि.6/11/2023 मा.अप्पर तहसीलदार यांच्या आदेशान्वये फेरफार उपविभागीय अधिकारी यांच्याकडील दि.15/5/2008 मुख्य रित्या गृहीत धरण्यात आले. दि.9/11/2023 रोजी मिळकत पैकी गट क्रं.11,12,26,37,42 मनू अग्रवाल, तन्वी अग्रवाल मुंबई, संजय चव्हाण यांना रात्री उशिरा खरेदीखत करून देण्यात आले. यांची नावे 7/12 वर आले आहे.
महंमद रशियोद्दीन यांच्या वारस प्रमाणपत्राचा अर्ज क्रं.29/2013 आज रोजी प्रलंबित आहे. त्याची पुढील तारीख 15/1/2024 आहे.
दि.17/10/2023 रोजीच्या आदेशात दिवाणी न्यायालयात आरसीएस क्रं.1210/2023 अन्वय अपिल करण्यात आलेली आहे. त्या दाव्यामध्ये मा.न्यायालयाने जमीन घेणाऱ्या विरोधात स्टे ऑर्डर दिलेली होती. तो दि.3/1/2024 रोजी मागे घेण्यात आला आहे. झालेल्या जमीन व्यवहाराची चौकशी करण्याचे आदेश महसूलमंत्री यांनी दिले. मयत शहा महंमद खान यांच्या वारसांनी जिल्हाधिकारी यांचे 17/10/2023 च्या आदेशाला मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ औरंगाबाद व विभागीय आयुक्त यांच्याकडे अपिल केले आहे. पुढील तारीख 18/1/2024 व 12/1/2024 आहे.
यातील काही गटातील समृद्धीसाठी भुसंपादन झाले मोबदला घेण्यासाठी भूसंपादन प्रकरणात मंत्रालयीन स्तरावर समिती गठीत करण्यात आली होती.
त्या समितीने दोन वर्षे सुनावणी घेतली. समितीने निष्कर्ष काढून मोबदला चूकीच्या पध्दतीने व बोगस कागदपत्रांच्या आधारे दिल्याचे समोर आले. जमिनीच्या खरेदी विक्री नंतर ज्यांच्या नावे जमीन झाली ते जमिनीचे मालक झाले आहे यातील काही तुकडे नोटरीवर नावे करून देण्यात आल्याची चर्चा आहे. दौलताबाद - अब्दीमंडी एका रस्त्यासाठी सुमारे 40 टक्के भुसंपादन करावे लागणार आहे. या रस्त्यासाठी या जमिनीचे भुसंपादन होऊ शकते. एनएचएआयकडून हा रस्ता होणार आहे.
शत्रु संपत्ती असल्याचा बोर्ड येथे मागील वर्षी लागल्याने संभ्रम निर्माण झाला आणि आता या जमीनीचा खरेदी विक्री व्यवहार होत असल्याने पत्रकार परिषदेत विरोध करण्यात आला.
What's Your Reaction?