बारावीची परीक्षा 10 फेब्रुवारीपासून तर दहावीची परीक्षा 20 फेब्रुवारीपासून...!

 0
बारावीची परीक्षा 10 फेब्रुवारीपासून तर दहावीची परीक्षा 20 फेब्रुवारीपासून...!

बारावीची परीक्षा 10 फेब्रुवारीपासून तर दहावीची परीक्षा 20 फेब्रुवारीपासून...!

पुणे, दि.13(डि-24 न्यूज)-

बारावी व दहावी लेखी परीक्षेची तारीख महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारी-मार्च 2026 परीक्षांचा घोषित केली आहे. बारावीची लेखी परीक्षा 10 फेब्रुवारी-2026 ते 18 मार्च-2026 या कालावधीत होणार आहे. यामध्ये माहिती तंत्रज्ञान आणि सामान्य ज्ञान विषयांच्या ऑनलाईन परीक्षांचा समावेश असेल.

राज्यातील पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या 9 विभागीय मंडळांकडून या बोर्डाच्या परीक्षा घेतल्या जातात.

मंडळाने जारी केलेल्या परिपत्रकानुसार 10 फेब्रुवारी-2026, बुधवार, 18 मार्च-2026 या कालावधीत होईल. दहावी बोर्ड लेखी परीक्षा 20 फेब्रुवारी-2026 ते 18 मार्च-2026 दरम्यान घेण्यात येईल. 

लेखी परीक्षेच्या अगोदर बारावीच्या प्रात्यक्षिक, तोंडी, अंतर्गत मुल्यमापन परीक्षा 23 जानेवारी-2026 ते 9 फेब्रुवारी 2026 दरम्यान होतील. दहावीच्या प्राथमिक परीक्षा 2 फेब्रुवारी-2026 ते 18 फेब्रुवारी-2026 या कालावधीत आयोजित करण्यात येतील. शिक्षण मंडळाचे सहसचिव प्रमोद गोफने यांच्या सहीने हे वेळापत्रक जारी करण्यात आले आहे. या परीक्षांचा विषयानिहाय सविस्तर अंतिम वेळापत्रक लवकरच मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करण्यात येईल. विद्यार्थ्यांना अभ्यास करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow